आरटीई 25 % प्रवेश 2024-25 साठी ऑनलाईन अर्ज भरणे सुरु, पहा वयोमर्यादा, पात्रता, अर्ज कसा करावा ? RTE admission Maharashtra 2024-25 ?

RTE admission maharashtra : नमस्कार मित्रांनो, 2024-25 या शैक्षणिक वर्षात आपल्या पाल्याला चांगल्या दर्जाच्या शिक्षणासाठी मराठी, सेमी इंग्लीश किंवा सिबीएससी पॅटर्न असणाऱ्या  खाजगी शाळेत मोफत शिक्षण घेण्यासाठी प्रवेशाची वाट बरेच पालक पहात होते, आता त्यांची प्रतिक्षा संपली आहे. कारण RTE आरटीई प्रवेश प्रक्रिया 2024-25 महाराष्ट्र (Right to Education Act (RTE)) प्रवेशाच्या अधिकारांतर्गत 2024-25 ऑनलाइन 17 मे, 2024 पासून ते 04 जून, 2024 पर्यंत आरटीई प्रवेश अर्ज सुरू करण्यात आलेले आहेत. ज्या पालकांना महाराष्ट्रातुन आरटीई अंतर्गत मोफत शिक्षणासाठी आपल्या पाल्याचा प्रवेश करावयाचा आहे. तर प्रवेशाच्या अटी काय आहे, प्रवेशासाठी पाल्याचे वयाची मर्यादा काय राहणार आहे, अर्ज कसा करावा, पात्रता काय असणार आहे, याबाबत संपुर्ण माहिती तुम्हाला लेखात मिळणार आहे, त्यासाठी तुम्हाला हा लेख शेवटपर्यंत वाचावा लागेल, आणि लेख आवडल्यास इतरांनाही शेअर करायला विसरु नका. धन्यवाद…

RTE- मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार 2010 मध्ये राज्यात 1 एप्रिल पासून लागू झालेला आहे. सरकारच्या नियमानुसार निमशासकीय शाळांनी प्रवेश स्तरावरील वर्गातील दुर्बल घटकातील मुलांसाठी 25 टक्के जागा राखीव ठेवलेल्या असतात व त्यामध्ये 1ली ते 8 वी पर्यंतचे मोफत शिक्षण होते.

Important Notice:

1) यापूर्वी सन २०२४-२५ या वर्षाकरिता आरटीई २५ टकके प्रवेश प्रक्रीयेसाठी बालकांच्या पालकांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. तथापि मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही प्रक्रीया स्थगित करण्यात आलेली आहे.

2) सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई अंतर्गत यापूर्वी ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या बालकाच्या पालकांनी पुन्हा नव्याने ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

3) यापूर्वी ऑनलाईन पदधतीने केलेल्या अर्जाच्या सन २०२४-२५ या वर्षाच्या आरटीई २५ टकके प्रवेश प्रक्रीयेसाठी विचार केला जाणार नाही याची कृपया पालकांनी नोंद घ्यावी.

हे पण वाचा 👉शिक्षणातील गॅप सर्टिफिकेट कसे काढावे-Gap Certificate ?

RTE 25  Admission Process 2024-25 Maharashtra साठी अर्ज कोण करु शकत ?

सन 2024-25 या शैक्षणिक सत्रात आरटीई 25 टक्के प्रवेशासाठी बालकाचे वय निश्चित करण्याबाबत.

वय वर्ष 4.5 पासुन वर्य 7.5 वर्ष पर्यंत वचिंत गटातील मुलेमुलीचे अर्ज करु शकतात

अर्ज करण्यासाठी वयोमर्यांदा (नवीन जी आर नुसार)

(दिनांक.22 फेब्रुवारी 2024 रोजी)

rte admission Maharashtra age limit

.क्र. प्रवेशाचा वर्ग वयोमर्यादा दि.31 डिसेंबर 2024 रोजीचे किमान वय दि.31 डिसेंबर 2024 रोजीचे कमाल वय
1 प्ले ग्रृप /नर्सरी (Playgroup & Nursery) 1 जुलै 2020- 31 डिसेंबर 2021 3 वर्षे  4 वर्ष 5 महिने 30‍ दिवस
2 ज्युनियर केजी (Junior KG) 1 जुलै 2019- 31 डिसेंबर 2020 4 वर्षे 5 वर्ष 5 महिने 30‍ दिवस
3 सिनियर केजी (Senior KG) 1 जुलै 2018- 31 डिसेंबर 2019 5 वर्षे 6 वर्ष 5 महिने 30‍ दिवस 
4 इयत्ता 1 ली (1st Standard) 1 जुलै 2017- 31 डिसेंबर 2018 6 वर्षे 7 वर्ष 5 महिने 30‍ दिवस

 

>वयोमर्यादेसाठी जीआर डाऊनलोड करण्यासाठी यावर क्लिक करा < 

RTE 25 महाराष्ट्र प्रवेश 2024-25 विद्यार्थ्यांना RTE प्रवेश 2024 साठी अर्ज करताना खालील कागदपत्रे सादर करावी लागतील. कागदपत्रांची यादी खालीलप्रमाणे आहे.

documents required for rte admission in maharashtra

  •  पत्त्याचा पुरावा
  •  जन्म प्रमाणपत्र
  •  आधार कार्ड
  • पासपोर्ट साईज फोटो
  • जात प्रमाणपत्र (एस.सी,एसटी)
  • उत्पन्न प्रमाणपत्र एक लाखापेक्षा कमी  (एस.सी, एसटी प्रवर्गासाठी आवश्यकता नाही)
  • अपंगत्व प्रमाणपत्र (असल्यास)
  •  संपूर्ण यादी

हे पण वाचा 👉 नोकरीत असतात 5 टक्के राखीव जागा, प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र कसे काढायचे ?

How To Apply For RTE admission maharashtra 2024-25 Online Application Form

RTE admission maharashtra

आरटीई महाराष्ट्र प्रवेश 2024-25 ऑनलाइन अर्ज कसा करावा ?

RTE 25 प्रवेश महाराष्ट्र ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील पायऱ्यांचे अनुसरण करा.

सर्वप्रथम तुम्हाला RTE admission maharashtra प्रवेश महाराष्ट्राच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. https://student.maharashtra.gov.in/.

  • येथे “ऑनलाइन अर्ज” लिंकवर क्लिक करा.
  • आता तुम्हाला “नवीन नोंदणी” लिंकवर क्लिक करावे लागेल.
  • मुलाचे नाव, जन्मतारीख, मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी इत्यादी सारखे तपशील योग्यरित्या प्रविष्ट करा.
  • आणि नोंदणी बटणावर क्लिक करा.
  • आता सर्व आवश्यक तपशील भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • तुमचा RTE महाराष्ट्र प्रवेश ऑनलाइन अर्ज पुन्हा तपासा. आणि Submit वर क्लिक करा.

आरटीई प्रवेश प्रक्रिया 2024-25 महाराष्ट्र प्रतीक्षा यादी, गुणवत्ता यादी 2024

RTE प्रवेश 2024 – 2025 प्रक्रिया निवड यादी, गुणवत्ता यादी आणि प्रतीक्षा लिंक अद्यतने आणि लिंक्स येथे दिल्या आहेत. आम्ही या पृष्ठावर अधिक तपशील जोडत राहतो. आमचा ब्लॉग ला फॉलो करा

हे पण वाचा 👉30 % महिला आरक्षण काय आहे ? | प्रमाणपत्र कसे काढायाचे ?

RTE admission maharashtra

RTE चा फॉर्म ऑनलाईन कसा भरायचा पहा

RTE कायद्यांतर्गत महाराष्ट्रातील खाजगी संस्थांमध्ये 25% राखीव शाळा जागांवर पात्र असलेल्या विद्यार्थ्यांचे पालक. त्यांनी ऑनलाइन अर्ज करावा. संपूर्ण अर्ज प्रक्रिया खाली दिली आहे:

  1. अधिकृत पोर्टल उघडा- student.maharashtra.gov.in.
  2. त्यानंतर पोर्टल उघडेल, RTE 25% पोर्टलच्या पर्यायावर टॅप करा.
  3. एक नवीन पोर्टल उघडेल
  4. ऑनलाइन अर्जावर क्लिक करा.
  5. अर्ज क्रमांक आणि पासवर्ड प्रविष्ट करा.
  6. फॉर्मवर दिलेला कॅप्चा कोड वाचा.
  7. लॉगिन दाबा.
  8. वापरकर्ता डॅशबोर्डमध्ये फॉर्म भरा.
  9. वर सूचीबद्ध केल्याप्रमाणे सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  10. शेवटी, सबमिट दाबा.

RTE admission maharashtra

सन 2024-25 साठी फेब्रुवारी 2024 पासुन प्रवेश प्रक्रीया सुरु होणार आहे. अधिकृत दिनांक जाहीर झाल्यानंतर खालील लिंक वरुन तुम्ही ऑनलाईन अर्ज सादर करु शकता.

 

Leave a Comment