संजय गांधी निराधार योजना, || पात्रता, अर्ज कसा करावा, शासन निर्णय, अर्जाचा नमुना || Sanjay Gandhi Niradhar Yojana Maharashtra ||

Sanjay Gandhi Niradhar Yojana Maharashtra 2024 : संजय गांधी निराधार योजनेविषयी आपण या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्रात महाराष्ट्र शासन राज्यातील गरीब नागरिकांसाठी विविध योजना राबवित असते, त्यापैकी एक योजना म्हणजे संजय गांधी निराधार योजना या योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनातर्फे  निराधार पुरुष व महिलास अंध, अपंग, अनाथ मुले, मोठ्या आजाराने ग्रस्त असलेले व्यक्ती, घटस्फोटीत महिला, परित्यकत्वा महिला, वेश्याव्यवसायापासून मुक्त झालेल्या महिलांना, आर्थिक साहित्य केले जाते जेणेकरून त्यांना त्यांच्या उपजीविकेसाठी व दैनंदिन गरजांसाठी कुटूंबावर किंवा इतर कोणावरही अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही. या मुळ उध्देशाने ही योजना सुरु करण्यात आलेली आहे.

संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा मुख्य उध्देश ? 

Table of Contents

राज्यात निराधार वृध्द व्यक्ती, अंध, अपंग, शारिरीक व मानसिक आजाराने रोगग्रस्त व्यक्ती व निराधार विधवांना अर्थसहाय्य देण्याच्या मूळ हेतूने संजय गांधी निराधार / आर्थिक दुर्बलांसाठी अनुदान योजना सन 1980 पासून राबविण्यात येत आहे. या योजनेमध्ये शासन निर्णयान्वये काही सुधारणा करुन ही योजना “संजय गांधी निराधार अनुदान योजना” या नावाने राज्यात निरंतर राबविण्यात येत आहे. या योजने अंतर्गत सध्या प्रतिमाह प्रति लाभार्थी रु.1500/- एवढे अनुदान त्यांच्या बँक खात्यात DBT व्दारे  देण्यात येत आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थी कोण-कोणत्या असणार आहेत ?Sanjay Gandhi Niradhar Yojana Maharashtra

निराधाराचा प्रवर्ग

अ) अपंग
  • अंध
  • अस्थिव्यंग
  • मूकबधिर
  • कर्णबधिर
  • मतिमंद

 इत्यादी प्रवर्गातील स्त्री अथवा पुरुष या योजनेस पात्र असू शकतात.

Sanjay Gandhi Niradhar Yojana

ब)  आजार
  • क्षयरोग
  • पक्षघात
  • प्रमस्तीष्कघात
  • कर्करोग
  • एड्स (एच.आय.व्ही-अ)
  • कुष्ठरोग
  • सिकलसेल

आणि सार्वजनिक आरोग्य विभागाने निश्चित केलेले दुर्धर आजार

यासारख्या आजारांमुळे स्वतःचा चरितार्थ चालवू न शकणाऱ्या पुरुष व महिला या योजनेचे या योजनेसाठी पात्र असू शकतात

क)  महिलांचे प्रवर्ग
  • निराधार महिला
  • घटस्फोट प्रकियेतील महिला
  • घटस्फोट प्रक्रियेत व घटस्फोट झालेल्या परंतु पोटगी न मिळालेल्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल.
  • घटस्फोट झालेली परंतु योजनेत विहित केलेल्या उत्पन्न मर्यादेपेक्षा कमी पोटगी मिळणारी महिला
  • अत्याचारीत महिला
  • वेश्या व्यवसायातुन मुक्त केलेली महिला
  • देवदासी,
  • परित्यकत्वा महिला
ड) आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे कुटूंब

(या योजनेत विहित उत्पन्न मर्यादेनुसार सदर कुटूंब पात्र असणे आवश्यक असते)

इ) अनाथ मुले
  1. मुलगा
  2. मुलगी
ई) तृतीयपंथी

हे पण वाचा 👉शिक्षणातील गॅप सर्टिफिकेट कसे काढावे-Gap Certificate ?

योजनेसाठी ज्या अटी आणि पात्रता ?

Sanjay Gandhi Niradhar Yojana

  1. अर्जदार किमान पंधरा वर्षापासून महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
  2. लाभार्थी व्यक्तीचे वय 18 ते 65 वर्षाआतील असणे आवश्यक आहे.
  3. 65 वर्षांवरील व्यक्तींना श्रावण बाळ निराधार योजना या योजनेचा लाभ घेता येईल.
  4. अर्जदाराकडे उत्पन्नाचा कोणताही स्त्रोत नसावा.
  5. अर्जदाराचे नाव दारिद्र रेषेखालील कुटुंब यादीत असणे आवश्यक आहे किंवा दारिद्र रेषेखालील कुटुंब नसल्यास रु. 21 हजार वार्षिक उत्पन्न असल्याबाबत तहसिलदार यांचा उत्पनाचा दाखला आवश्यक आहे.
  6. लाभार्थ्यांचे मुलं हे 21 वर्षा एैवजी 25 वर्षाची होईपर्यंत किंवा नोकरी मिळेपर्यंत शासकीय/ निमशासकीय किंवा खाजगी यामध्ये अगोदर असेल त्यामध्ये लाभ घेणारे नसावे त्याचप्रमाणे अगोदर घडेल तोपर्यंत लाभार्थी व मुलांना लाभ देण्यात येईल. मुलाला नोकरी मिळाल्यापासून शासकीय/ निमशासकीय व खाजगी व मुलांच्या कुटुंबाचे उत्पन्न विचारात घेऊन लाभार्थ्यांना पात्र ठरविण्यात येणार येते.
  7. मुलींच्या बाबत लग्न होईपर्यंत किंवा त्याला नोकर वेळेपर्यंत शासकीय/ निमशासकीय किंवा खाजगी लाभ मिळेल त्या अनुषंगाने नोकरी करणाऱ्या शासकीय/ निमशासकीय किंवा खाजगी अविवाहित मुलीच्या उत्पन्नावर कुटुंबाचे उत्पन्न याचा विचार करून लाभार्थ्याचे पात्रता ठरविण्यात येणार आहे. मुलीचा विवाह झाल्यानंतर तिच्या पालक कुटुंबाला अनुदान पुढे चालू ठेवण्यात येणार आहे
  8. लाभार्थीच्या उत्पन्नाचा कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न हे 21000 पर्यंत मर्यादित असणार आहे.

या योजनेखाली लाभ मिळण्यासाठी अर्जदाराच्या अपत्य संख्याची अट राहणार नाही.

हे पण वाचा 👉30 % महिला आरक्षण काय आहे ? | प्रमाणपत्र कसे काढायाचे ?

संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी लागणारे कागदपत्र ?

Sanjay Gandhi Niradhar Yojana

  1. अर्जदाराचा फोटो
  2. आधार कार्ड
  3. पॅन कार्ड
  4. मतदान कार्ड
  5. तलाठी अहवाल किंवा जॉब कार्ड

ओळखीचा पुरावा म्हणून आपल्याला या पाहिजे आहे

पत्त्याचा पुरावांमध्ये

  1. शिधापत्रिका
  2. ग्रामसेवक तलाठी यांचा रहिवासी असलेला दाखला आपण घेऊ शकता

वयाच्या पुऱ्याव्यामध्ये

  1. शाळा सोडल्याचा दाखला
  2. जन्म प्रमाणपत्र

   आपण या ठिकाणी लावू शकता .

 उत्पन्नाचा पुरावा म्हणून

तहसीलदार यांचा उत्पन्नाचा प्रमाणपत्र आपण या ठिकाणी लावू शकता

  • दारिद्रय रेषेखालील असल्याबाबत पुरावा किंवा रु.21 हजार वार्षिक उत्पन्न असल्याबाबत पुरावा.
  • अपंग असेल तर 45 हजार पर्यंत उत्पन्न हे चालते.
  • रहिवासी दाखला (स्वयंघोषीत)
  • अपंगत्व असल्याचे सक्षम अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र (जिल्हा शल्य चिकीत्सक)
  • विधवा असल्यास पतीचे मृत्यू प्रमाणपत्र .
  • अनाथ असल्याचा दाखला (वय 18 वर्ष आतील)

वरील पैकी ज्या सबबीखाली अर्ज करावयाचा असेल, त्या संबंधीतच कागदपत्र सादर करावे लागतील.

Sanjay Gandhi Niradhar Yojana

अर्ज कोठे करावा ?

संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी आपणास, आपल्या नजिकच्या आपले सरकार सेवा केंद्र (CSC) ला भेट द्यावी लागेल. त्यानंतर खालील चरणांचे पालन करावे.

  • पायरी-1. संजय गांधी निराधार योजनेची फाईल घ्यावी लागेल.
  • पायरी-2. त्यावर आपल्या सजेच्या तलाठयाकडुन सही व शिक्का घ्यावा.
  • पायरी 3. आवश्यक कागदपत्र जोडुन, आपले सरकार सेवा केंद्र (CSC) वर परत जाऊन, आपली संचीका ऑनलाइन करुन, घ्यावी.
  • पायरी 4. फाईल ऑनलाईन केल्यानंतर, मुळ प्रत व ऑनलाईनची पावती (Hard Copy) आपल्या तहसिल कार्यालयाच्या संजय गांधी योजनेच्या विभागात जमा करावी.

अर्ज सादर केल्यानंतर, तहसिल कार्यालयच्या संजय गांधी विभागातुन आपल्या अर्जाची तपासणी होईल. व आपणास काही दिवसात नोटीस येऊन आपला अर्ज मंजुर/नामंजुर झाल्या याबाबत पुढील प्रकीया कळविण्यात येईल.

टिप :- अर्ज सादर करण्याच्या ज्या-त्या जिल्हा/तालुक्याच्या प्रकियेत थोडया फार प्रमाणात बदल असु शकतो, आपणास विनंती असेल की, संबंधीत तहसिल कार्यालय किंवा आपले सरकार सेवा केंद्रात या योजने संबंधी माहिती घेणे योग्य होईल.

अर्जाचा नमुना डाऊन करण्यासाठी येथे दिलेला आहे, अर्जाचा नमुना डाऊनलोड करु शकता.

Sanjay Gandhi Niradhar Yojana Application Form

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी फिस किती लागते ? Sanjay Gandhi Niradhar Yojana

संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा अर्ज ऑनलाईन करण्यासाठी आपले सरकार सेवा केद्रावर रु.52 च्या आसपास लागु शकतात, व उत्पन्न प्रमाणपत्र सुध्दा ऑनलाईन काढावे लागेल त्यासाठी वेगळे रु. 33.60 पावती असते. फिसमध्ये थोडया फार प्रमाणात बदल असु शकतो.

अर्जदार फाईल स्वत: ऑनलाईन करुन शकतो का ?

अर्जदार फाईल ऑनलाईन करुन शकतो, परंतु अर्जदाराला फाईल ऑनलाईन करणे, थोडे किचकट होईल, आणि तरी पण स्वत: ऑनलाईन करावायाची असल्यास शासनाच्या अधिकृत वेबसाइट वर भेट देऊन करु शकता.

 

FAQ,

प्रश्न :- संजय गांधी निराधार योजनेसाठी कोण पात्र आहे?

उत्तर :- संजय गांधी निराधार योजनेसाठी पात्र लाभार्थी,  निराधार महिला/पुरुष, अंध, अपंग, अनाथ मुले,  दुर्धर आजार, घटस्फोटीत महिला, परित्यकत्वा महिला, वेश्याव्यवसायातून मुक्त स्त्रिया, अत्याचारी महिला, तृतीयपंथी (ट्रान्झेंडर), आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे कुटूंब,  इत्यादी.या योजनेसाठी पात्र असतात.

प्रश्न :- निराधार योजनेची रक्कम किती आहे?

उत्तर :- या योजनेत, पात्र लाभार्थीस दरमहा  रु.1500/- इतके आर्थिक सहाय्य दिले जाते .

प्रश्न :- महाराष्ट्र 2023 मध्ये अपंगत्व योजना काय आहे?

उत्तर :- अपंगासाठी महाराष्ट्रात संजय गांधी निराधार अनुदान योजना, या नावाने योजना आहे, या योजने अंतर्गत पात्र लाभार्थीस दरहमहा 1500/- रुपये अनुदान दिले जाते.

प्रश्न :- संजय गांधी निराधार योजना कागदपत्रे ?

उत्तर :- वरील माहिती वाचल्यानंतर आवश्यक कागदत्रांची माहिती मिळेल.

प्रश्न :- संजय गांधी निराधार योजना फॉर्म Online ?

उत्तर :- अर्जदार फाईल ऑनलाईन करुन शकतो, परंतु अर्जदाराला फाईल ऑनलाईन करणे, थोडे किचकट होईल, आणि तरी पण स्वत: ऑनलाईन करावायाची असल्यास शासनाच्या अधिकृत वेबसाइट https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en वर भेट देऊन करु शकता.

Leave a Comment