लेक लाडकी योजना सुरु, अर्ज कोठे करावा ? Lek Ladki Yojana Form pdf download

Lek Ladki Yojana Form pdf : मित्रांनोलेक लाडकी योजनाही योजना आपल्या राज्यातील महिलांना सक्षम करण्यासाठी तयार करण्यात आली आहे. केशरी आणि पिवळी शिधापत्रिका असलेली कुटुंबे या योजनेसाठी पात्र असणार आहे. ही योजना केवळ 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुलींनाच लागू होणार आहे.  मुलींच्या जन्मदराला चालना देण्याचे आणि शिक्षण आणि कुपोषण यासारख्या महत्त्वाच्या समस्यांचे निराकरण करण्याच्या स्पष्ट उद्दिष्टासह, “Lek Ladki Yojanaची घोषणा करण्यात आली आहे. मुलींच्या चांगल्या भविष्यासाठी झटत असलेल्या कुटुंबांसाठी प्रकाशाचा किरण देणारी ही योजना आहे. “ Lek Ladki Yojanaही योजना मुलींचा जन्मदर वाढविण्यास प्रोत्साहनच देत नाही तर त्यांच्या शिक्षणाला उज्वल भविष्यातील प्राधान्य देणारी ही योजना असुन, या संपुर्ण योजनेचा फार्म कोठे मिळेल, अर्ज कोठे भरायचा, Lek Ladki Yojana Form PDF  Download कोठुन करायाचा याची सर्व  माहिती पाहण्यासाठी आपणास हा लेख अंतिम पर्यत वाचावा लागणार आहे.

लेक लाडकी योजना : एकनाथ शिंदे सरकारने महाराष्ट्रात 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुलींना मोठी भेट दिली आहे.  राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी  “ Lek Ladki Yojana”  राबविण्याचा निर्णय या मंत्रीमंडळाच्या बैठकीत  मागील वर्षी 10 ऑक्टोंबर 2023 रोजी घेण्यात आलेला होता.

त्याअनुषांगानेLek Ladki Yojana”  ही योजना महाराष्ट्रात प्रत्यक्षात सुरु झाली आहे. याअंतर्गत मुलींना रु.101,000/- रक्कम दिली जाणार आहे. ही आर्थिक मदत मुलीच्या जन्मानंतर ती 18 वर्षांची होईपर्यंत ठराविक टप्प्याटप्यात दिली जाणार आहे. Lek Ladki Yojana Form

लेक लाडकी योजना काय आहे ? What is the Lak Ladaki scheme

लेक लाडकी योजने अंतर्गत महाराष्ट्रातील पिवळी व केशरी शिधापत्रिका (Ration Card) धारक गरीब कुटुंबातील मुलींना महाराष्ट्र सरकारकडून आर्थिक मदत दिली जाणार आहे. या योजनेंतर्गत मुलीच्या जन्मानंतर रु.5000/- आर्थिक मदत देऊन योजनेची सुरवात केल्यानंतर ठराविक टप्प्या-टप्प्याने राज्य सरकारकडून मदतीची रक्कम दिली जाईल.

हे पण वाचा 👉30 % महिला आरक्षण काय आहे ? | प्रमाणपत्र कसे काढायाचे ?

Lek Ladki Yojana ?  प्राथमिक उद्देश

उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय भाषणात “माझी कन्या भाग्यश्री” योजनेच्या जागी लखपती योजना सुरू करण्याची घोषणा केलेली होती. या योजनेचा लाभ केशरी व पिवळे रेशनकार्ड कुटूंबातील केवळ 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुलींसाठी होणार आहे. ज्याचा प्राथमिक उद्देश

 1. मुलींचा जन्मदर वाढवणे
 2. पालकावरील मुलीच्या शिक्षणाचा भार कमी करणे.
 3. मुलींचा मृत्यू दर कमी करणे.
 4. मुलींचा बालविवाह रोखणे,
 5. मुलींचे कुपोषण रोखणे
 6. मुलींच्या शिक्षणाला सर्वांगीण प्रोत्साहन यासारख्या प्रमुख समस्यांचे निराकरण करणे आहे.

पैसे कधी कसे  मिळणार ? Lek Ladki Yojana When and how will you get the money?

लेक लाडकी योजनेंतर्गत महाराष्ट्र सरकार (DBT) व्दारे थेट लाभार्थी हस्तांतरण करुन लाभाची रक्कम केशरी व पिवळया रेशनकार्ड धारक गरीब कुटूंबात मुलीचा पुढील प्रमाणे टप्या-टप्यात देणार आहे.

1

पहिला हप्ता मुलीचा जन्म झाल्यावर रु.5000/-

2

दुसरा हप्ता मुलगी पहीलीत प्रवेश करेल तेव्हा रु.6000/-

3

तिसरा हप्ता मुलगी सहाव्या इयत्तेत पोहोचल्यावर रु.7000/-

4

चौथा हप्ता मुलगी अकरावीत पोहोचल्यावर रु.8000/-

5

पाचवा हप्ता आणि अंतिम हप्ता मुलगी 18 वर्षांची झाल्यावर शेवटचा हप्ता रु.75000/-
एकुण लाभ :- 10,1,000/-

अश्या प्रमाणे एकुण 1,01,000/- मदत देण्यात येईल, मुलींना सक्षम करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

हे पण वाचा 👉 नोकरीत असतात 5 टक्के राखीव जागा, प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र कसे काढायचे ?

योजनेच्या अटी शर्ती ? Terms and conditions of the scheme

 1. लाभार्थी मुलीचे कुटूंब महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे.
 2. मुलीचा जन्म महाराष्ट्र राज्यात झालेला असणे आवश्यक आहे.
 3. या योजनेचा लाभ 1 एप्रिल 2023 आगोदर जन्मलेल्या मुलींच पात्र असणार नाही.
 4. ही योजना 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुलीं या योजनेसाठी पात्र असणार आहे.
 5. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटूंबात केशरी किंवा पिवळी शिधापत्रिका असणे आवश्यक आहे.
 6. ही योजना वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांच्या आत असणाऱ्या कुटुंबासाठी पात्र आहे.
 7. ही योजना मात्र मुलींसाठी असल्यामुळे या योजनेस मुलगा पात्र असणार नाही.

आवश्यक कागदपत्रे  ? Required Documents for  Lek  Ladki scheme

Lek Ladki Yojana Form

 1. अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असला पाहीजे.
 2. कुटुंबाचे रेशनकार्ड (पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड)
 3. मुलीचे आधारकार्ड
 4. रहिवासी प्रमाणपत्र
 5. बँकचे पासबुक
 6. पासपोर्ट साईज फोटो
 7. मोबाईल नंबर
 8. उत्पन्न प्रमाणपत्र (1 लाखाच्या आत)
 9. मुलीचे जन्मप्रमाणपत्र

हे पण वाचा 👉शिक्षणातील गॅप सर्टिफिकेट कसे काढावे-Gap Certificate ?

Lek Ladki Yojana overview

योजनेचे नांव लेक लाडकी योजना
विभाग महिला व बालकल्याण
घोषणा 10 ऑक्टोंबर 2023
योजनेची अट 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुलींसाठी फक्त

अर्ज कोठे करावा ? लेक लाडकी योजना फॉर्म PDF

Lek Ladki Yajana 2024 या योजनेसाठीसाठी अर्ज स्विकारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, यासाठी शासनाद्वारे PDF  Form प्रसिद्ध करण्यात आला आहे

Lek Ladki Yojana Form

या फॉर्म चा वापर करून लाभार्थ्यांना त्यांचा अर्ज आपल्या हददीतील अंगणवाडी सेविका कडे सादर करायचा आहेलेक लाडकी योजना फॉर्म pdf download साठी Direct Link खाली दिली आहे

👉Lek Ladki Yajana Online Form  Link 

अर्जदारांनी फॉर्मची Lek Ladki Yojana Form PDF download करून त्याची प्रिंट आउट काढून घ्यावी. मग फॉर्म योग्य रीतीने व सुंदर हस्ताक्षरात भरून तो आपल्या हददीतील अंगणवाडी सेविका यांचयाकडे सर्व आवश्यक कागदपत्रांसह जमा करणे आवश्यक आहे.

आपल्या हददीतील अंगणवाडी सेविका तुमची पुढील अर्ज प्रक्रिया पार पाडतील, आणि जेव्हा अर्ज Approve होईल तेव्हा लाभार्थी मुलीच्या नावे पैसे खात्यावर जमा करण्याची शासनाद्वारे प्रकिया केली जाईल.

Lek Ladki Yojana Form योजनेचा फॉर्म  अंगणवाडी सेविका कडे सादर केल्यानंतर, आणि त्यामध्ये कागदपत्रांमध्ये काही त्रुटी आढळुन आल्यास त्यानंतर  पुढील 1 महिन्याच्या आत सर्व आवश्यक कागदपत्रासह अर्ज सबमिट करावा लागेल.

 

FAQ,

Ques :- 1) लेक लाडकी योजना कधी सुरु झाली?

Ans :- लेक लाडकी योजना, राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी  “ Lek Ladki Yojana”  राबविण्याचा निर्णय या मंत्रीमंडळाच्या बैठकीत  मागील वर्षी 10 ऑक्टोंबर 2023 रोजी घेण्यात आलेला होता. आता प्रत्यक्षात मात्र अर्ज सुरु झाले आहे.

Ques :- 2)  लेक लाडकी योजनेसाठी कोण पात्र आहे?

Ans :- पिवळी व केशरी रेशनकार्ड धारक कुटूंबातील केवळ 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुलीं या योजनेसाठी पात्र असणार आहे.

Ques :- 3) माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी कोण पात्र आहे?

Ans :- “माझी कन्या भाग्यश्री” योजनेचे नांव बदलुन आता “लेक लाडकी योजना” असे या योजनेचे नाव झालेले आहे.

 

Leave a Comment