मागेल त्याला विहीर 4 लाख रुपये अनुदान !! Vihir Anudan Yojana Maharashtra 2024

Vihir Anudan Yojana Maharashtra 2024

Vihir Anudan Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र राज्यात शेतकऱ्यांच्या शेतजमीन सिंचनासाठी  शासन वेगवेगळया अनुदानित योजना राबवित असत, त्या अनुषंगाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, म्हणजेच मनरेगाच्या अंतर्गत वैयक्तिक लाभाची सिंचन विहीर खोदण्यासाठी चार लाख रुपये इतके अनुदान दिले जाते, याबाबतचा शासन निर्णय महाराष्ट्र सरकारने  4 नोव्हेंबर 2022 रोजी जारी केलेला आहे, या निर्णयात असे म्हटले आहे की, महाराष्ट्रात अजून 387500  विहीरी खोदणे शक्य असल्याचे भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा यांनी म्हटलं आहे त्यामुळे तुम्हाला विहिरीसाठी अनुदान मिळवायचा असेल तर त्यासाठीचा अर्ज नेमका कुठे आणि कसा करायचा यासाठीची पात्रता नेमकी काय लागते याची सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत, त्यासाठी तुम्हाला लेख संपुर्ण वाचावा लागेल.

लाभार्थ्यांची निवड नेमकी कशी केली जाणार आहे ? Vihir Anudan Yojana Maharashtra 2024

लाभधारक हा खालीलपैकी कोणत्या एका वर्गातील असेल तर प्राधान्यक्रम त्याची निवड केली जाणार आहे :-

 1. अनुसूचित जाती
 2. अनुसूचित जमाती
 3. भटक्या जमाती
 4. विमुक्त जमाती
 5. दारिद्र रेषेखालील लाभार्थी
 6. स्त्री करता असलेली कुटुंब
 7. विकलांग व्यक्ती करता असलेली कुटुंब
 8. जमीन सुधारणांचे लाभार्थी
 9. इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी
 10. सीमांत शेतकरी म्हणजे ज्याच्याकडे 2.5 एकर (1 हेक्टर) पर्यंत जमीन आहे.
 11. अल्पभूधारक शेतकरी म्हणजे ज्याच्याकडे 5 एकर (2 हेक्टर) पर्यंत जमीन आहे.

लाभार्थ्यांची पात्रता नेमकी काय आवश्यक असणार आहे ?

rojgar hami yojana sinchan vihir

 • अर्जदाराकडे 1 एकर शेतजमीन सलग असणे आवश्यक आहे म्हणजे 40 गुंठे जमीन सलग असावी, पुर्वी ही मर्यादा 60 गुंठे इतकी होती.
 • पिण्याच्या पाण्याच्या विहिरीपासून 500 मीटर पेक्षा जास्त अंतरावर सिंचन विहीर खोदता येणार आहे, त्यापेक्षा कमी अंतरावर घेता येणार नाही.
 • दोन विहीरींमध्ये 150 मिटर अंतरावर आसावी अशी अट होती, ही अट आता अनुसुचित जाती-जमाती, दारिद्रयरेषेखालील कुटूंबासाठी लागु राहणार नाही. आणि याशिवाय खाजगी विहीरीपासुन पासून 150 मीटर अंतराची अट सुद्धा लागू राहणार नाही.
 • लाभ धारकाच्या सातबारा उताऱ्यावर याआधीच विहीरीची नोंद असु नये.
 • एकुण जमीनीचा दाखला (8-अ) उतारा असावा.
 • एकापेक्षा जास्त शेतकरी विहीर घेऊ शकतील पण त्यांचे एकुण जमीनीच सलग क्षेत्र 1 एकरपेक्षा जास्त असाव.
 • अर्जदार हा मनरेगा म्हणजेच जॉबकार्ड धारक असला पाहीजे.

हे पण वाचा 👉 पीएम विश्वकर्मा कौशल सम्मान योजना 2023, ग्रामीण शिल्पकार आणि कारागिरांना मिळेल एक ते दोन लाख रुपये ? 

अर्ज कोठे व कसा करायचा ? rojgar hami yojana sinchan vihir

हात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र अंतर्गत सिंचन सुविधा म्हणून वैयक्तिक लाभाची सिंचन विहीर मंजूर करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करुन ॲप डाऊलनलोड करा.

ॲप डाऊनलोड करण्यासाठी 👉 येथे क्लिक करा

ॲप डाऊनलोड केल्यानंतर आपण आपला अर्ज ऑनलाईन भरु शकता.

 आवश्यक कागदपत्रे ? Vihir Anudan Yojana Maharashtra

 1. सातबाराचा ऑनलाईन उतारा
 2. एकुण जमीनीचा दाखला 8-अ ऑनलाइन उतारा
 3. मनरेगाचा जॉब कार्ड ची प्रत
 4. जर का तुम्ही सामुदायिक घेणार असाल तर तुम्ही सर्वजण मिळून 40 गुंठे जमीन सलग असल्याचा पंचनामा आणि समोपच्चारानं पाणी वापरा बाबत सर्वांचे करारपत्र

विहीरीसाठीच्या सर्व प्रशासकीय मान्यता पूर्ण झाल्यानंतर सर्वसाधारण परिस्थितीत दोन वर्षात विहिरीचे बांधकाम पूर्ण झाले पाहिजे पण जर का अपवादात्मक परिस्थिती असेल म्हणजे पूर असेल दुष्काळ असेल तर मात्र तीन वर्षात विहिरीचे काम पूर्ण करता येणार आहे

हे पण वाचा 👉पीएम किसान सन्मान  निधी 6000/- रुपये  नवीन नावनोंदणी सुरू, 2024 👈

 योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना आर्थिक मदत कशी केली जाणार आहे ते पहा ? Vihir Anudan Yojana Maharashtra 2024

या योजनेचा जो शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे की, ज्यात असं म्हटल आहे की, महाराष्ट्र हे मोठे राज्य असून प्रत्येक भागाची स्थानिक व भौगोलिक परिस्थिती भिन्न आहे त्यामुळे राज्यासाठी विहिरीचा एक सारखाच आकार व दर निश्चित करणे शक्य होणार नाही असं असल्यामुळे विहिरीच्या कामासंबंधी आर्थिक व तांत्रिक बाबी निश्चित करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा पातळीवर एक समिती स्थापन केली जाईल त्यानुसार प्रत्येक जिल्ह्याने विहिरीसाठी चार लाख रुपयांपर्यंत अनुदान मंजूर करावा किंवा करण्यात यावा.

निष्कर्ष (conclusion)

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत तुम्हाला विहिरीसाठी अनुदान मिळवायचा असेल तर त्यासाठीचा अर्ज नेमका कुठे आणि कसा करायचा यासाठीची पात्रता नेमकी काय लागते याची सविस्तर माहिती आपण या लेखात वर दिलेली आहे. त्यामुळे आपण सुध्दा आपल्या मोबाईल ॲप वरुन या योजनेचा अर्ज करुन लाभ घेऊ शकता. तर मग मंडळी विहिरीच्या अनुदानाविषयी सविस्तर माहिती सांगणारा लेख तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा धन्यवाद.

Leave a Comment