(PM Vikas) पीएम विश्वकर्मा कौशल सम्मान योजना 2023, PM Vishwakarma Yojana ग्रामीण शिल्पकार आणि कारागिरांना मिळेल एक ते दोन लाख रुपये ?

पीएम विश्वकर्मा कौशल सम्मान योजना, पीएम विकास योजना, विश्वकर्मा श्रम सम्मान योजना, ऑनलाइन अर्ज, पात्रता, लाभार्थी, लाभ, विशेषता, कागदपत्र, अधिकारिक वेबसाइट, हेल्पलाइन नंबर, ताज़ी खबर (PM Vikas Yojana Maharashtra, PM Vishwakarma Shram Samman Yojana in Marathi, PM Vishwakarma Kaushal Samman Yojana Maharashtra, PM Vishwakarma Yojana) (Benefit, Eligibility, Beneficiary, Documents, Online Apply, Registration, Official Website, Helpline Number, Latest News)

वित्तमंत्री निर्मला सितारमणजी यांच्याव्दारे सन 2023 मध्ये भारताचे आर्थिक बजट सादर केले गेले, ज्यात खुप साऱ्या महत्वपुर्ण घोषणा करण्यात आल्या, त्यातुनच एक कल्याणकारी योजना सरकारव्दारे पारंपारिक शिल्पकार आणि कारागीरांसाठी सुरु करण्याची घोषणा करण्यात आली, या योजनेचे नांव सरकारने पीएम विश्वकर्मा कौशल सम्मान योजना ठेवले आहे. ज्याच्या अंतर्गत पारंपारिक शिल्पकार आणि कारागीर समुहातील येणाऱ्या 140 जातींचा समावेश करण्यात आलेला आहे. अखेर या योजनेत काय खास आहे आणि या योजनेच्या अंतर्गत सरकारचे लक्ष्य काय आहे. हे आपण या Blog मध्ये पाहणार आहोत, या लेखात आपण जाणुन घेणार आहोत की, “पीएम विश्वकर्मा कौशल सम्मान योजना काय आहेPM Vishwakarma Yojana योजनेसाठी अर्ज कसा करावा.

 हे पण वाचा 👉  PMJJBY फक्त 20 रुपयात दोन लाखाचा विमा पाहूया संपूर्ण माहिती 👈

Table of Contents

PM विश्वकर्मा कौशल सम्मान योजना -2023 (PM Vishwakarma Kaushal Samman Yojana in Marathi)

PM Vishwakarma Yojana 2023 : Overviews

योजनेचे नांव पीएम विश्वकर्मा कौशल सम्मान योजना
घोषणा कोणी केली अर्थमंत्री निर्मला सीतारमण
योजनेचा उद्देश्य कारागिरांना प्रशिक्षण देऊन आर्थीक मदत करणे
लाभार्थी शिल्पकार किंवा कारागिर समुदायातील येणाऱ्या सर्व जाती
घोषणा कधी झाली आर्थिक बजट 2023-24 मध्ये
तरतुद किती ? 13000 हजार कोटी रुपयांची तरतुद
कधी लागु झाली मार्च, 2023 मध्ये
अर्ज भरण्यास सुरुवात कधी होणार ? 17 सप्टेंबर 2023 पासुन
अधिकारिक वेबसाइट

येथे क्लिक करा

पीएम विश्वकर्मा कौशल सम्मान योजना काय आहे ? (What is PM Vishwakarma Kaushal Samman Yojana)

PM Vishwakarma Yojana अर्थात पीएम विश्वकर्मा कौशल सम्मान योजना, सुरु करण्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सितारमण यांच्याव्दारे आर्थिक बजट 2023-24 च्या दरम्यान करण्यात आली आहे, या योजने अंतर्गत 13000 कोटी रुपयाचे तरतुद करण्यात आलेली आहे,

या योजनेमुळे अश्या मोठया नागरीकांना लाभ प्राप्त होणार आहे जे पारंपारिक शिल्पकार आणि कारागिर समुहाशी संबंधीत आहेत. योजनेचे नांव भगवान विश्वकर्मा यांच्या नावावर ठेवण्यात आलेले आहे. मिळालेल्या माहितीनुसार विश्वकर्मा समुहात अंदाजे 140 च्या जवळपास जाती येतात, ज्या भारताच्या वेग-वेगळया ठिकाणी राहतात,

या योजनेच्या अंतर्गत या समुहांशी संबध ठेवणाऱ्या पारंपारिक शिल्पकार आणि कारागिरांचे कौशल्य वाढविण्याची संधी उपलब्ध करुन दिली जाईल, पारंपारिक शिल्पकार आणि कारागिरांचे कौशल्य वाढविण्यासाठी मदत करण्यात येईल व त्यांना आर्थिक मदत सुध्दा सरकार करणार आहे. या योजनेअंतर्गत केंद्रीय बजटमध्ये परांपरागत कारागीर आणि शिल्पकारांसाठी आर्थिक सहाय्यता पॅकेजची घोषणा करण्यात आली आहे.

हे पण वाचा 👉पीएम किसान सन्मान  निधी 6000/- रुपये  नवीन नावनोंदणी सुरू, २०२३ 👈

पीएम विश्वकर्मा कौशल सम्मान योजनेचा उद्देश्य (Objective)

सरकारच्या अनुसार पारंपारिक शिल्पकार आणि कारागीर कोणत्याही क्षेत्रातील असो, त्यात कौशल्य असणे अंत्यत आवश्यकत असते, बऱ्याच वेळेस पारंपारिक शिल्पकार आणि कारागीरांना कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण मिळु शकलेले नाही, आणि जे अनुभवी असतात, त्याच्याकडे पुरेशे भांडवल उपलब्ध नसते, अशा परिस्थितीत तो आपला उदरनिर्वाहही करू शकत नाही, आणि ना समाजातील प्रगतीचा हिस्सा सुध्दा बनु शकतात,

यामुळे सरकारव्दारे PM Vishwakarma Yojana ची सुरवात करण्यात आली. कारण या योजनेच्या अंतर्गत त्यांना आवश्यक प्रशिक्षण पण दिल्या जाईल व त्यांच्याकडे पुरेश भांडवल नाही त्यांना सरकारव्दारे भांडवल सुध्दा उपलब्ध करुन दिले जातील. या प्रकारे प्रशिक्षण आणि आर्थिक सहाय्य मिळल्यानंतर विश्वकर्मा समुहात संबंध ठेवणाऱ्या नागरीकांची आर्थिक स्थिती मजबुत होईल आणि समाज-देशाच्या प्रगतीत आपले योगदान देतील.

हे पण वाचा 👉 हरविलेल्या पॅनकार्ड चा नंबर कसा शोधावा ?

पीएम विश्वकर्मा कौशल सम्मान योजनेचे लाभ आणि विशेषता (Benefit and Key Features)

  • या योजनेचा फायदा विश्वकर्मा समुहात संबंध ठेवणाऱ्या जाती जसे की, सुतार, कुंभार, सोनार, लोहार, इत्यादी सारख्या जातींना होणार आहे.
  • या योजनेच्या अंतर्गत पारंपारिक शिल्पकार आणि कारागिरांना त्याच्या कामाचे प्रशिक्षण व प्रमाणपत्र दिल्या जाईल व जे नागरीक स्वत:चा व्यवसाय सुरु करु इच्छित आहे त्यांना सरकार आर्थिक मदत सुध्दा देणार आहे.
  • या योजनेमुळे विश्वकर्मा समुहातील नागरीकांमध्ये रोजगाराची संख्या वाढेल आणि बेरोजगारीची संख्या कमी होईल.
  • योजनेच्या अंतर्गत प्रशिक्षण व प्रमाणपत्र प्राप्त होईल, आणि पैसा प्राप्त झाल्याने विश्वकर्मा समुहातील नागरीकांची आर्थिक स्थितीमध्ये खुपच जोरात सुधारणा होईल.
  • या योजनेमुळे देशातील मोठया जनसंख्येला फायदा होईल. जो विश्वकर्मा समुहात येतात.
  • योजनेच्या अंतर्गत जे आर्थिक सहाय्यता पॅकेज घोषीत केले आहे, ज्याचा मुख्य उद्देश आहे त्यांना msme मुल्य मालिका सोबत जोडणे.
  • निर्मला सितारमण यांच्याव्दारे हाताने वस्तु तयार करणाऱ्या नागरीकांना बँक प्रमोशन च्या माध्यमातुन नॅशनल आणि इंटरनॅशनल बँकसोबत सुध्दा संलग्न करण्यात येईल.

पीएम विश्वकर्मा कौशल सम्मान योजना 5%  व्याजावर 2 लाखाचे कर्ज

PM Vishwakarma Yojana या योजनेच्या अंतर्गत लाभार्थी पारंपारिक शिल्पकार आणि कारागीरांना 5% व्याजावर पहिल्या चरणात 1 लाख रुपये, तर दुसऱ्या चरणसात 2 लाख रुपये पर्यंतचे कर्ज दिल्या जाणार आहे. आणि त्याचबरोबर त्यांना 500 रुपये भत्ता पण प्रत्येक महिन्याला प्रशिक्षणासोबत दिला जाईल.

हे पण वाचा 👉बिना आधार नंबर हरवलेले आधारकार्ड कसे काढावे 2023 ?

PM Vishwakarma Kaushal Samman  योजनेचे फायदे? Benefits Of the Scheme

पंतप्रधान व्यावसायिक आणि ज्ञान योजना (PMVKS) ज्या व्यक्तींनी कौशल्य विकास कार्यक्रम घेतले आहेत आणि भारतातील कौशल्य विकास आणि उद्योजकता क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे अशा व्यक्तींना अनेक फायदे दिले जातात.

  • कौशल्याची ओळख: PMVKS प्रमाणपत्रे देऊन आणि आर्थिक प्रोत्साहन देऊन भारतीय तरुणांच्या कौशल्य आणि ज्ञानाला मान्यता देते.
  • उद्योजकीय सहाय्य: हा कार्यक्रम पारंपारिक शिल्पकार आणि कारागिरांना कर्ज, अनुदाने आणि इतर आर्थिक प्रोत्साहनांच्या सुविधेद्वारे त्यांचे स्वतःचे उद्योग, व्यवसाय स्थापित करण्यासाठी प्रोत्साहन देतो. PMVKS अंतर्गत आर्थिक सहाय्यामध्ये उद्योग, व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी निधी आणि अनुदाने तसेच पुढील प्रशिक्षणासाठी भत्ता यांचा समावेश होतो. प्रशिक्षण पात्रता, पूर्ण केलेले कौशल्य विकास कार्यक्रम आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मधील कामगिरी यासारख्या घटकांद्वारे प्रदान केलेल्या प्रोत्साहनांची अचूक रक्कम निर्धारित केली जाते.
  • विस्तारित रोजगाराच्या संधी: अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रांतील शिल्पकार व कारागिरांना संधी निर्माण करण्यासाठी PMVKS उद्योग आणि सरकारी संस्थांसोबत सहयोग करते.
  • आर्थिक उन्नती: PMVKS विविध क्षेत्रांच्या विस्तारास समर्थन देणार्‍या कुशल आणि उद्योजक कार्यबलाला चालना देऊन भारताच्या आर्थिक विकासात महत्त्वपूर्ण योगदान देईल अ शी अपेक्षा आहे.
  • कौशल्य विकास आणि उद्योजकीय संस्कृतीची जोपासना: हा कार्यक्रम शिल्पकार व कारागिरांना नवकल्पना आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देतो, नवीन उद्योग आणि उपक्रमांच्या उभे करण्यास मदत करतो. यामुळे, एका भरभराटीच्या आणि गतिमान अर्थव्यवस्थेच्या विकासाला चालना मिळते.

पीएम विश्वकर्मा कौशल सम्मान योजनेसाठी पात्रता (Eligibility)

PM Vishwakarma Kaushal Samman Yojana

  • या योजनेत विश्वकर्मा समुहातील येणाऱ्या 140 जाती अर्ज करण्यात पात्र असतील.
  • योजनेत अर्ज करण्यासाठी नागरीकांनाकडे महत्वपूर्ण कागदपत्र असणे आवश्यक आहे.
  • या योजनेत फक्त भारतीय रहिवासींनाचा अर्ज करता येईल.

पीएम विश्वकर्मा कौशल सम्मान योजने लागणारी आवश्यक  कागदपत्रे (Documents)

PM Vishwakarma Yojana

  • आधारकार्ड
  • पॅनकार्ड
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • जात प्रमाणत्र
  • मोबाईल नंबर
  • ईमेल आईडी
  • पासपोर्ट साईज फोटो

हे पण वाचा 👉शिक्षणातील गॅप सर्टिफिकेट कसे काढावे-Gap Certificate 

पीएम विश्वकर्मा कौशल सम्मान योजनेसाठी अर्ज (Application)

सन 2023 च्या आर्थिक बजट च्या निर्मला सितारमण यांच्याव्दारे PM Vishwakarma Yojana सुरु करण्याची घोषणा करण्यात आली, यामुळे 17 सप्टेंबर 2023 रोजी आधिकारीकपणे योजनेला सुरवात होणार आहे.

15 ऑगस्ट 2023 रोजी स्वतंत्रता दिवसाचे अवचिंत्य साधुन प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी PM Vishwakarma Yojana लाँच करण्याची घोषणा केलेली होती, यानंतर दुसऱ्याच दिवशी 16 ऑगस्ट 2023 ला कॅबिनेटव्दारे मंजुरी देण्यात आली, ही योजना 17 सप्टेंबर 2023 पासुन विश्वकर्मा जयंतीचे अवचिंत्य साधुन सुरु करण्यात येईल.

PM Vishwakarma Yojana 2023 : कोणा-कोणाला मिळेल या योजनेचा लाभ

PM Vishwakarma Yojana या योजनेच्या अंतर्गत सरकार तर्फे एकुण 18 असे शिल्पकार किंवा कारागिरांच्या प्रकारला ठेवण्यात आलेले आहे, त्यांना या योजने अंतर्गत लाभ दिल्या जाईल. असे व्यक्ती जे या 18 प्रकारातुन कोणत्याही प्रकारचे काम करत आहेत ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

  1. सुतार
  2. नाव/होडी बनावणारे
  3. अस्त्र बनावणारे
  4. लोहार
  5. कुलुप बनावणारे
  6. हातोडे आणि टुलकिट बनावणारे
  7. सोनार
  8. कुंभार
  9. मुर्तिकार
  10. चांभार
  11. मिस्त्री
  12. चटाई, झाडु, दुरडी बनावणारे
  13. पारंपारीक बाहुल्या आणि खेळणे बनावणारे
  14. व्हावी
  15. माळा बनावरणारे
  16. धोबी
  17. टेलर
  18. माश्याचे जाळे बनावणारे

PM Vishwakarma Yojana 2023 : Official Notice

PM Vishwakarma Kaushal Samman Yojana

PM Vishwakarma Yojana 2023 : असा करा ऑनलाइन अर्ज

  • या योजनेच्या अतंर्गत लाभासाठी अर्ज करण्यासाठी Link जारी करण्यात आली आहे.
  • परंतु अर्जदार स्वत:हुन अर्ज करु शकणार नाही.
  • यासाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला आपल्या जवळील आपले सरकार सेवा केंद्र (CSC Center) वर जावे लागेल.
  • तेथे गेल्यानंतर आपल्या आपले सरकार सेवा केंद्र (CSC Center) चालकास या योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्यास सांगावे लागेल.
  • त्यानंतर सरकारव्दारे जारी केलेल्या लिंकवर जाऊन आपल्या User ID आणि Password च्या माध्यमातुन Login करुन आपला या योजनेच्या अंतर्गत लाभ मिळण्यासाठी अर्ज करुन देईल.
  • त्यानंतर सरकारव्दारे आपल्या अर्जाची पडताळणी केल्यानंतर आपल्यालाल या योजनेचा लाभ मिळणे सुरु होऊ शकेल.

अर्ज प्रक्रिया ? Application Process

PM Vishwakarma Yojana अर्ज प्रक्रिया अधिकृत योजनेच्या वेबसाइटद्वारे ऑनलाइन सोयीस्करपणे उपलब्ध आहे. यशस्वीरित्या अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी त्यांची आवश्यक कागदपत्र सादर करणे आणि त्यांच्या पूर्ण झालेल्या कौशल्य विकास कार्यक्रमांबद्दल तपशील प्रदान करणे आवश्यक आहे. खालील चरण अर्ज प्रक्रियेची रूपरेषा देतात:

  • https://www.pmksy.gov.in/ येथे अधिकृत PMVKS वेबसाइटला भेट देऊन सुरुवात करा.
  • इच्छुक उमेदवारांनी अधिकृत आपले सरकार सेवा केंद्र (CSC Center) वर जाऊन ऑनलाइन अर्ज भरून त्यांची PMVKS नोंदणी सुरू करावी. या फॉर्ममध्ये अर्जदाराने घेतलेल्या कौशल्य विकास कार्यक्रमांबद्दल वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती आणि तपशीलासह आवश्यक असतील.
  • उमेदवाराला आवश्यक दस्तऐवज अपलोड करणे आवश्यक आहे, ज्यात प्रमाणपत्रे, शैक्षणिक प्रतिलेख आणि त्यांच्या अर्जाला चालना देणारे इतर समर्पक रेकॉर्ड समाविष्ट आहेत.
  • अर्ज सबमिट केल्यानंतर, उमेदवार त्यांच्या अर्जाच्या स्थितीबाबत निर्णयाची वाट पाहतील, जे मॅसेजव्दारे कळवले जाईल.
हे पण वाचा 👉 प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र-Dharangrast-धरणग्रस्त प्रमाणपत्र कसे काढायचे?

PMVKS साठी निवड प्रक्रिया ? Selection Process for PMVKS

PM Vishwakarma Yojana सरकार नियुक्त समितीच्या निर्मित देखरेखीखाली निवड प्रक्रियेचा वापर करत असते. ज्यांना मान्यता आणि आर्थिक प्रोत्साहन मिळण्यासाठी निवडले गेले ते शासनाच्या अधिकृत समारंभात सहभागी होतील. या योजनेसाठी निवडीचा प्रकिया खालीलप्रमाणे केली जाऊ शकते:

  • प्रारंभिक स्क्रीनिंग: पहिल्या टप्प्यात सबमिट केलेल्या अर्जांचे प्राथमिक पडताळणी केली जाईज, जेथे पात्रता निकष आणि अर्जामध्ये दिलेल्या माहितीची छाननी केली जाते.
  • सहाय्यक दस्तऐवजीकरणाचे मूल्यमापन: अपलोड केलेल्या कागदपत्र, प्रमाणपत्रे, शैक्षणिक आणि इतर संबंधित नोंदींसह, कार्यक्रमासाठी पात्रतेची पुष्टी करण्यासाठी पूर्णपणे मूल्यांकन केले जाते.
  • कौशल्य विकास कार्यक्रमांचे मूल्यांकन: उमेदवाराने पूर्ण केलेल्या कौशल्य विकास कार्यक्रमांचे विश्लेषण त्यांच्या कौशल्य आणि ज्ञानाची पातळी मोजण्यासाठी केले जाते.
  • मुलाखत (आवश्यक असल्यास): काही प्रकरणांमध्ये, निवडलेल्या उमेदवारांना PMVKS साठी त्यांच्या योग्यतेचे अधिक मूल्यमापन करण्यासाठी मुलाखतीसाठी आमंत्रित केले जाऊ शकते.
  • अंतिम निर्णय: उमेदवार निवडीचा अंतिम निर्णय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या अंतर्गत स्थापन केलेल्या समितीकडे असतो. हा निर्णय सर्वसमावेशक मूल्यमापन प्रक्रियेवर आधारित आहे, ज्यामध्ये प्रारंभिक स्क्रीनिंग, दस्तऐवज मूल्यांकन, कौशल्य कार्यक्रम मूल्यमापन आणि जेथे लागू असेल तेथे मुलाखतींचा समावेश आहे.
  • प्रमाणपत्रे आणि आर्थिक प्रोत्साहन पुरस्कार: यशस्वी उमेदवारांना नंतर PM Vishwakarma Yojana योजनेमध्ये नमूद केलेल्या तरतुदींनुसार प्रमाणपत्रे आणि आर्थिक प्रोत्साहन दिले जाते.

येथे क्लिक करुन👉 आमच्या दुसऱ्या वेबसाइट -चावडी ला सुध्दा भेट देऊ शकता.

निष्कर्ष (Conclusion)

PM Vishwakarma Yojana ही योजना पारंपारिक शिल्पकार आणि कारागिरांना त्यांची कौशल्ये आणि कर्तृत्व दाखविण्यासाठी एक व्यासपीठ देते, तसेच त्यांच्या उद्योजकीय उपक्रमांना चालना देण्यासाठी कर्ज, अनुदाने आणि शिष्यवृत्तींद्वारे आर्थिक लाभ मिळवून देतात, तसेच प्रगत शिक्षण आणि प्रशिक्षणाचा पाठपुरावा करतात. PMVKS  भारतातील कौशल्य विकास आणि उद्योजकतेच्या महत्त्वाचा पुरस्कार करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून, प्रवीण व्यक्तींना त्यांच्या मौल्यवान योगदानाबद्दल पोचपावती मिळवून देण्यासाठी आणि बक्षिसे मिळविण्याचा एक उल्लेखनीय प्रसंग सादर करणे.

Leave a Comment