प्रकल्पग्रस्त-धरणग्रस्त-प्रमाणपत्र कसे काढावे-Prakalpgrast Pramanpatra -Dharangrast Certificate How to Apply 2023

ज्या व्यक्तीची शासकीय कामांसाठी खाजगी मालमत्ता किंवा जमिन जेव्हा संपादीत होते. तेव्हा त्या मालमत्तेवर किंवा जमीनीवर अवलंबुन असणाऱ्या कुटुंबाला शासनाकडुन उपविभागीय अधिकारी किंवा जिल्हा पुर्नवसन अधिकारी यांच्या मार्फत प्रकल्पग्रस्त (Prakalpgrast Pramanpatra) प्रमाणपत्र प्रदान करण्यात येते. शासकीय नोकरीमध्ये प्रकल्पग्रस्त या आरक्षीत कोठयातुन आरक्षण मिळण्याकरीता किंवा संपादित जमिनीचा किंवा मालमत्तेचा मोबदला प्राप्त करण्यासाठी मा.न्यायालयात प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्राची आवश्यकता असते. तसेच प्रकल्पग्रस्त असणाऱ्या व्यक्तींना शासकीय योजना अनुदान इत्यादीसाठी हे प्रमाणपत्र महत्वाचे ठरत असते. त्यामुळे कुटूंब अवलंबित एका व्यक्तीस आपण आपल्या संमतीनुसार नामनिर्देशीत करु शकतो. तर चला पाहुया याची संपुर्ण प्रकीया. कृपया हा लेख आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करायला विसरु नका.

Prakalpgrast Pramanpatra-प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्रासाठी लागणारी कागदपत्र 

 • विहित नमुन्यातील अर्ज कोर्ट फी स्टॅम्पसह.
 • ज्या वर्षी संबंधित जमीन संपादित केली गेली त्या वर्षाचा ७/१२ चा उतारा.
 • प्रकल्पग्रस्त असल्याचे शपथपत्र  रंगीत पासपोर्ट साईज फोटोसह
 • संबंधित जमीन संपादीत झाली असल्याचे त्या कुटुंबाला दिलेले तहसिलदार यांचे कडील होल्डिंगचे प्रमाणपत्र.
 • संपादीत जमीन/मालमत्ता चा मावेजा मिळाला असल्यास सी.सी.फॉर्मचा (अवार्ड नक्कल) उतारा.
 • संपादीत जमीन/मालमत्तेची कलम ४ (१),कलम ९(३),(४) किंवा १२ (२)ची नोटिसीची मूळप्रती.
 • ई– स्टेटमेंटची नक्कल प्रत.
 • प्रकल्पग्रस्तांचे तहसीलदार यांचे कडील कुटुंबांचे प्रमाणपत्र ..
 • ग्रामपंचायत हददीतील घर, मिळकत किंवा मालमत्ता संपादित केले असल्यास ग्रामपंचायत नमुना -8 चा उतारा.
 • प्रकल्पग्रस्त व्यक्ती मयत झालेले असल्यास, मयतांच्या वारसांचे प्रमाणपत्र व वारसाचे शपथपत्र.
 • प्रकल्पग्रस्त व्यक्ती   व प्रकल्पग्रस्त व्यक्तीची वारस पत्नी, हे दोघेही मयत असल्यास मुलाचे शपथपत्र व इतर वारसांचे समंती पत्र.
 • तलाठ्यांचे जमीन संपादित झाल्याचे प्रमाणपत्र.
 • शिधापत्रिकेची / रेशनकार्ड  प्रत.
 • प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र नामनिर्देशीत करण्याचे शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र / प्रवेश निर्गम उतारा व पासपोर्ट साईज फोटो.

 

हे पण वाचा 👉  EWS Certificate – EWS प्रमाणपत्र

Prakalpgrast Pramanpatra मिळवण्याची प्रकीया

तलाठी यांचे होल्डींग प्रमाणपत्र घेतल्यानंतर तहसिल कार्यालय येथे विहीत नमुन्यात अर्ज सादर करुन तहसिलदार यांचे कडील होल्डींग प्रमाणपत्र हस्तगत करावे ।  त्यानंतर आपल्या तालुक्यातील उपविभागीय अधिकारी किंवा जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांच्याकडे विहित नमुन्यात अर्ज सादर करून सदरील प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र हस्तगत  करावे।

हे पण वाचा 👉Caste Validity in Marathi- जात पडताळणी – जात वैधता कशी करायची ?

FAQ

प्रश्न :- 1) प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र हस्तांतरण नियम
उत्तर – प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र पासून लाभ घेतला नसल्यास प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र  इतर वारसास हस्तांतरणकरता येऊ शकते.
प्रश्न :- 2) प्रकल्पग्रस्त म्हणजे काय ?
उत्तर -.ज्या व्यक्तीची शासकीय कामांसाठी खाजगी मिळकत, मालमत्ता किंवा जमिन जेव्हा संपादीत होते. त्या व्यक्तीला प्रकल्पग्रस्त असे म्हणतात.
प्रश्न :- 3) प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र कसे काढावे ?
उत्तर -तलाठी यांचे होल्डींग प्रमाणपत्र घेतल्यानंतर तहसिल कार्यालय येथे विहीत नमुन्यात अर्ज सादर करुन    तहसिलदार यांचे कडील होल्डींग प्रमाणपत्र हस्तगत करावे ।  त्यानंतर आपल्या तालुक्यातील उपविभागीय  अधिकारी किंवा जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांच्याकडे विहित नमुन्यात अर्ज सादर करून सदरील प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र हस्तगत  करावे.

Leave a Comment