पीएम किसान सन्मान निधी नवीन नावनोंदणी सुरू, शेतकर्यांसाठी आनंदाची बातमी २०२३ ।। PM Kisan Samman Nidhi New Registration 2023

PM Kisan Samman Nidhi New Registration 2023 : पीएम किसान सन्मान निधी योजना हा एक भारत सरकारचा उपक्रम आहे ज्याचा मुख्य उद्देश भारतातील अल्प आणि बहुभुधारक शेतकऱ्यांना तीन टप्यामध्ये वार्षीक 6 हजार रुपये आर्थिक सहाय्य प्रदान करणे हे आहे. जर काही शेतकरी बांधव ही योजना सुरु झाल्यापासुन काही कारणास्तव तुम्ही हया योजनेपासुन वंचित राहीलेले असाल किंवा तुम्ही नवीन शेतकरी असाल व तुम्ही हया योजनेचा सुरु होण्याची वाट पहात असाल आणि तुम्हाला योजनेसाठी नोंदणी करायची असेल तर तुम्हाला आनंदाची बातमी आहे. याबाबत महाराष्ट्र शासनाने प्रधानमंत्री किसान सम्मान निधी (Pm Kisan Samman Nidhi Registration) योजनेच्या कार्यपध्दतीत सुधारणा करण्याची मान्यता दिनांक.15/06/2023 रोजी शासन निर्णयात दिली आहे. त्यामुळे आता नवीन नाव नोंदणी केल्यानंतर कार्यालयामार्फत मान्यता मिळू शकते.

पीएम किसान सन्मान निधी नवीन नावनोंदणी सुरू, ।। PM Kisan Samman Nidhi New Registration 2023

PM Kisan Samman Nidhi Yojana Maharashtra या योजनेत नवीन नाव नोंदणी करण्यासंदर्भात बर्‍याच उणीवा होत्या, त्यामुळे बरेच शेतकरी बांधव  PM Kisan Samman Nidhi Yojana योजनेपासून वंचित राहत होते. परंतु आता महाराष्ट्र शासनाने सदरील योजनेची कार्यपद्धतीत सुधारणा करणाबाबत प्रशासनास सूचना दिलेल्या आहेत. आता उणीवा दूर होऊन जास्तीस जास्त शेतकरी बांधवांना या योजनेत सहभागी होता येणार आहे.
 
👇PM Kisan Samman Nidhi Yojana या योजनेची कार्यपध्दतीत सुधारणा बाबत👇

👉शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लीक करा.👈

Pm Kisan New Registration लागणारी आवश्यक कागदपत्रे ?

  1.  आधारकार्ड (आधारकार्डला मोबाईल नंबरलिंक असणे आवश्यक आहे.)
  2. पासपासबुक (बँक खात्याला आधारलिंक असणे आवश्यक आहे.)
  3.  रेशन कार्ड
  4. 7/12 व एकुण जमीनीचा दाखला
  5. फेरफार नक्कल

PM Kisan Samman Nidhi New Registration 2023।। पीएम-किसान सन्मान निधी नवीन शेतकरी नोंदणी प्रकीया

  1. शेतकऱ्यांना (Pm Kisan New Farmer Registration) नविन नांवनोंदणी प्रक्रिया सुरू करण्यासाठी, पीएम-किसान सन्मान निधीच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. https://pmkisan.gov.in/
  2. त्यानंतर ” फार्मर्स कॉर्नर” या पर्यायावर गेल्यानंतर “New Farmer Registration”  (हा दुवा वापरुन थेट जाऊ शकता https://pmkisan.gov.in/RegistrationFormNew.aspx ) नवीन शेतकरी नोंदणी दर्शविणारा तत्सम पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा. New Farmer Registration Form हा पर्याय दिलेले.
New Farmer RFegistration Form
  • येथे दोन पर्याय दिसतील 1. Rural Farmer RegistrationUrban Farmer Registration शेतकऱ्याची शेतजमीन ग्रामीण (Rural) भागात मोडत असेल तर, पर्याय 1 निवडावा, शेतकऱ्याची शेतजमीन शहरी (Urban) भागात मोडत असेल तर, पर्याय 2 हा निवडावा.
  • त्यानंतर आपले आधारकार्ड नंबर व मोबाईल नंबर टाकुन आपले महाराष्ट्र हे राज्य निवडा. त्यानंतर Captcha Code (प्रत्येकी वेळी नवीन असतो) भरुन Get OTP या पर्यायावर क्लीक करा.
  • त्यानंतर तुमच्या आधारला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर आगोदर 4 अंकी OTP येईल, व तो भरुन पडताळणी केल्यानंतर परत एक 6 अंकी आधार OTP येईल. तो भरुन पडताळणी केल्यानंतर आपला नवीन नाव नोंदणी फॉर्म ओपन होईल.
Pm Kisan Sanman Nidhi Form
  1. फॉर्ममध्ये, तुम्हाला विविध प्रकारचे तपशील प्रदान करणे आवश्यक असेल. प्रदान केलेल्या पर्यायांमधून तुमचा जिल्हा, तालुका व शेतजमीन असलेले गाव निवडून फॉर्म भरणे सुरु करा. त्यानंतर, तुमची श्रेणी निवडा, जी वैयक्तिक शेतकरी, सामाईक शेतकरी असू शकते.
  2. गाव, तहसील, पोस्ट ऑफिस आणि पिन कोड यासह तुमचा संपूर्ण पत्ता तपशील तपासुन घ्या.
  3. सर्व आवश्यक माहिती प्रविष्ट केल्यानंतर, भरलेला संपुर्ण तपशील पडताळुन पहा.
  4. 7/12, बॅक पासबुक, आधाकार्ड व रेशनकार्ड (एकाच फाईलध्य स्कॅन करुन) अपलोड करा.
  5. आणि कॅप्चा किंवा सुरक्षा कोड पडताळणी पूर्ण करा. शेवटी, नोंदणी फॉर्म सबमिट करा.
  6. एकदा तुमची नोंदणी यशस्वी झाली की तुम्हाला अर्जाचा नोंदणी क्रमांक प्राप्त होईल. हा क्रमांक भविष्यातील संदर्भासाठी सुरक्षित जपून ठेवावा. यानंतर तुमच्या नोंदणीवर प्रक्रिया केली जाईल आणि अधिकाऱ्यांकडून पडताळणी केली जाईल, त्यानंतर तुम्हाला (Pm Kisan Samman Nidhi 2023) PM-किसान सन्मान निधीचे लाभ थेट तुमच्या नोंदणीकृत बँक खात्यात मिळणे सुरू होईल.
  7. सदर प्रक्रीया आपण स्वत: मोबाईल वरुन सुध्दा करु शकता,किंवा आपल्या जवळील आपले सरकार सेवा केंद्राला भेट देऊन सुध्दा आपली नोंदणी करु शकता.
  8. नोंदणी प्रक्रियेतील किंवा आवश्यकतांमधील कोणत्याही बदलांसह अपडेट राहणे महत्त्वाचे आहे. म्हणून, नियमितपणे अधिकृत PM-किसान सन्मान निधी वेबसाइटला भेट द्या किंवा नवीन शेतकरी नोंदणीसंदर्भात सर्वात अचूक आणि अद्ययावत माहितीसाठी संबंधित तहसिलदार कार्यालय किंवा कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधा.

 हे पण वाचा 👉  PMJJBY फक्त 20 रुपयात दोन लाखाचा विमा पाहूया संपूर्ण माहिती 👈

निष्कर्ष (Conclusion)

Pm Kisan Samman Nidhi Yojana Maharashtra नवीन नाव नोंदणी सुरु झालेली आहे. ही योजना अल्प व बहुभुधारक शेतकऱ्यांना प्रती वर्ष तीन टप्यात 6000 रुपये आर्थीक मदत करते. व त्याबाबत महाराष्ट्र शासनाने दिनांक.15/06/2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार पीएम किसान सम्मान निधी योजना अधीक प्रभावीपणे राबवीण्याबाबत कार्यपध्दती सुधारणा करण्याबाबत प्रशासनास सुचना दिलेल्या आहेत, त्यामुळे ही योजना सुरु झाल्यापासुन काही वंचित राहीलेले शेतकरी व नवीन शेतकरी हया योजनेचा लाभ घेऊ शकतात.

 

FAQ,

प्रश्न : 1) पीएम किसान नवीन नोंदणी सुरू आहे का?

उत्तर :- PM Kisan Samman Nidhi New Registration सुरू झालेले आहे, तुम्ही अर्ज करु शकता.

प्रश्न : 2) पीएम किसान ऑनलाइन अर्ज करू शकतो का?

उत्तर :- PM Kisan Samman Nidhi New Registration सुरू झालेले आहे, तुम्ही ऑनलाइन अर्ज करु शकता.

प्रश्न : 3) शेतकऱ्यांना 6000 रुपये कसे मिळतील?

उत्तर :-  प्रत्येक नोंदणीकृत शेतकऱ्यांला प्रती वर्ष 6000 रुपये हे तीन टप्यात म्हणजेच चार-चार महिन्याच्या अंतरात मिळत असतात.

प्रश्न : 4) मी माझा पीएम किसान लाभार्थी स्थिती कोठे तपासू शकतो?

उत्तर :-  अधीकृत वेबसाईटला भेट देऊन ” फार्मर्स कॉर्नर” येथील Know Your Status या पर्यायावर क्लीक करुन स्थिती तपासु शकता.

प्रश्न : 5) मोबाईल नंबरद्वारे पीएम किसान स्टेटस कसे तपासता येईल?

उत्तर :-  यासाठी तुम्हाला पीएम किसान ही app Play Store वरुन डाऊनलोड करुन स्टेटस तपासता येईल.

 

Leave a Comment