खुल्या प्रवर्गासाठी 10 टक्के आरक्षण ? ews certificate Maharashtra – ews certificate प्रमाणपत्र कसे काढावे 2024 ?

ews certificate maharashtra : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना शासकीय नोकरी आणि उच्च शिक्षण घेण्यासाठी महाविद्यालयातील प्रवेशांसाठी देण्यात आलेल्या १० % आरक्षणाच्या वैधतेवर मा.सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे. १०३ व्या घटना दुरुस्तीच्या अन्वये करण्यात आलेली आरक्षणाची तरतूद वैध असल्याचा निकाल मा. सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे। आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना समाजात सन्मानाने जगता यावे व त्यांना शिक्षणात आणि नोकरीत संधी उपलब्ध व्हावी, यासाठी या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना १० टक्के आरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारने आरक्षणाची तरतूद केलेली आहे। २०१९ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने हे विधेयक मंजुर केले होते. यापुढे EWS Certificate या प्रमाणपत्रा आधारे उच्च शिक्षणात व शासकीय नोकरीत लाभ घेता येईल.
EWS म्हणजे Economically Weaker Sections याचा अर्थ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असा होतो. ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी आहे अशा व्यक्तींना व विद्यार्थ्यांना EWS अंतर्गत शिक्षणात आणि शासकीय नोकरीत आरक्षण मिळू शकतं. हे आरक्षण एससी, एसटी, एनटी या प्रवर्गांसाठी नसून फक्त खुल्या प्रवर्गासाठी आहे. तर चला पाहुया “EWS Certificate” काढायची संपुर्ण प्रकीया. कृपया हा लेख आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करायला विसरु नका.
हे पण वाचा 👉 प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र-Dharangrast-धरणग्रस्त प्रमाणपत्र कसे काढायचे?

EWS Certificate चा फायदा कोणाला होणार?

 • खुल्या प्रवर्गातील ‍विद्यार्थ्यानां याचा लाभ घेता येणार आहे.
 • एससी,एसटी,ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यानां याचा लाभ घेता येणार नाही.
 • कुटुंबाचे एका आर्थिक वर्षाचे वार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी असलेल्या ‍विद्यार्थ्यानां  शिक्षणात व नोकरीत आरक्षण मिळू शकणार आहे.
 • आरक्षणासाठी पात्र व्यक्तीच्या कुटुंबात शेती दोन हेक्टर (5 एकर) पेक्षा अधिक नसावी.
 • एक हजार चौरस फूट किंवा त्यापेक्षा जास्त मोठं रहिवासी घराचे क्षेत्रफळ नसावं.
 • महानगर पालिका क्षेत्रातील कुटुंबांचे घराचं रहिवासी क्षेत्र ९०० चौरस फुटापेक्षा जास्त नसावं.
 • गैर नगरपालिका किंवा ग्रामीण भागातील कुटुंबासाठी क्षेत्र १८०० चौरस फूट जागेची अट आहे.

हे पण वाचा 👉30 % महिला आरक्षण काय आहे ? | प्रमाणपत्र कसे काढायाचे ?

EWS Certificate Maharashtraप्रमाणपत्र कस मिळवावे ?

ews certificate maharashtra online
EWS Certificate साठी आपल्या नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्रातुन सर्वात आगोदर उत्पन्न प्रमाणपत्र काढुन घ्यावे, त्यानंर ‍विहीत नमुन्यातील अर्ज इतर कागदपत्रांसह परत आपले सरकार सेवा केंद्रावर जमा लागतील. तेथुन ऑनलाईन केल्यानंतर आपले EWS Certificateमिळण्याची प्रक्रीय सुरु होईल.

 

हे पण वाचा 👉शिक्षणातील गॅप सर्टिफिकेट कसे काढावे-Gap Certificate

EWS Certificate‍ साठी कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यक असते ? ews certificate maharashtra documents required

 1. विहित नमुन्यातील अर्ज.
 2. लाभार्थ्याच्या वडिलांचे व स्वत:चे आधार कार्ड.
 3. लाभार्थ्याचे व त्यांच्या वडिलांची शाळा सोडल्याचा दाखला (TC) किंवा प्रवेश निर्गम उतारा.
 4. राशन कार्ड     ‍
 5. रहिवाशी प्रमाणपत्र-स्वंयघोषीत
 6. उत्पन्नाचा पुरावा (7/12, ८अ / फॉर्म १६ / इमकम टॅक्स भरल्याचा पुरावा).
 7. अर्जदार अथवा त्यांचे कुटुंबातील सदस्य हे दि.१३ ऑक्टोबर १९६७ रोजी किंवा त्या आधीचे महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असल्या बाबतचा पुरावा.
 8. स्वघोषणा पत्र.
 9. पासपोर्ट फोटो.

हे पण वाचा 👉 हरविलेल्या पॅनकार्ड चा नंबर कसा शोधावा ?

EWS Certificate किती वर्षांसाठी वैध आहे ?

EWS Certificate वैधता फक्त १ वर्षांची असते, त्यानंतर परत नुतणीकरण करता येते. ते उत्पन्नावर अवलंबुन आहे. उत्पन्न वाढल्यास EWS Certificateलाभ घेता येणार नाही.

FAQ

प्रश्न :-1) EWS Certificate Maharashtra online apply

उत्तर – Aple Sarkar Seva Kendra

प्रश्न :-2) EWS certificate Maharashtra documents required

उत्तर – As shown above SR. 1 to 9

प्रश्न :-3) EWS certificate Maharashtra income limit

उत्तर – As shown above 8 Lac.

 

Leave a Comment