कुसुम सोलर पंप योजना 2023 करिता नवीन अर्ज सुरू; 2 लाख सौर कृषी पंप वितरित होणार | Kusum Solar Pump Yojana Maharashtra 2023

Kusum Solar Pump Yojana Maharashtra : नमस्कार शेतकरी मित्रांनो केंद्र शासनाच्या वतीने पीएम कुसुम सोलर पंप योजना ही संपूर्ण देशामध्ये तसेच आपल्या महाराष्ट्र राज्यात सुद्धा राबविण्यात येत आहे. या पी एम कुसुम सोलर योजना अंतर्गत राज्यातील जवळपास 2 लाख शेतकरी बांधवांना सोलर पंपाचे वाटप करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी पीएम कुसुम योजना अंतर्गत Kusum Solar Pump मिळवण्याकरिता ऑनलाइन पद्धतीने पोर्टलवर अर्ज करायचे आहेत. शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्याकरिता पीएम कुसुम योजनेचे दोन लाख सौर कृषी पंप वाटप करण्याची जाहीर करण्यात आलेली आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी बांधवांना यावर्षी मोठ्या प्रमाणात सौर कृषी पंपाचे वितरण होत आहेत. Solar Pump Yojana Maharashtra अंतर्गत शेतकरी बांधवांकडून नवीन अर्ज स्वीकारण्यात येत असून पात्र असलेल्या शेतकरी बांधवांना सौर कृषीपंप मिळवण्याकरिता ऑनलाईन अर्ज करायचे आहेत.

Kusum Solar Pump Yojana Maharashtra

आपल्या महाराष्ट्र राज्यातील जवळपास 20 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार असून उर्वरित जिल्ह्यांकरिता सुद्धा लवकरच Kusum Solar Pump Yojana Maharashtra नवीन अर्ज सुरू होणार आहे.  राज्यातील अनेक शेतकरी कित्येक दिवसांपासून वाट पाहून आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांकरिता जे शेतकरी त्यांच्या शेतामध्ये विहीरीवर सोलर पंप बसू इच्छित आहेत, अशा शेतकऱ्यांना ही एक आनंदाची बातमी ठरणार आहे. येणाऱ्या यापुढील पोस्टमध्ये आपण कुसुम सोलर पंप योजने संदर्भात संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत, त्यामुळे नियमितपणे आमच्या या वेबसाईटवर भेट देत राहा व ही माहिती सर्व शेतकरी मित्रांना सुद्धा शेअर करायला विसरू नका.

राज्यातील शेतकरी  बांधवांना 24 तास सौर पंपाच्या माध्यमातून शेतीच्या सिंचनासाठी पाणी उपलब्ध व्हावे तसेच शेतकऱ्यांना जलसिंचनाच्या कोणत्याही प्रकारच्या सुविधांचा तुटवडा निर्माण होऊ नये याकरिता राज्यातील शेतकऱ्यांना महापारेषण तर्फे 1 लाख PM Kusum Solar Pump वितरित करण्यात येणार आहेत. शेतकरी बांधवांना सौर कृषीपंप मिळाल्यामुळे वेळेवर शेती पिकांना पाणी देता येईल व शेतकरी जास्तीत जास्त पिकं घेऊ शकतील आणि त्यांचे उत्पन्न वाढतील उत्पन्न वाढल्यास शेतकरी कुटुंब आर्थिक दृष्ट्या सक्षम होईल.

कुसुम सोलर पंप मिळण्याकरिता अर्ज कसा करायचा? PM Kusum Solar Pump Yojana How to Apply for

शेतकरी मित्रांनो Kusum Solar Pump योजना अंतर्गत शेतकरी बांधवांकडून अर्ज स्वीकारण्यात येत असून टप्प्या-टप्प्याने सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अर्ज करता येणार आहे. सध्या राज्यात महापारेषण मार्फत एक लाख सौर कृषीपंप वितरित करण्याचा कार्यक्रम आखण्यात येत आहेत. त्यामुळे जर तुम्हाला कुसुम सोलर पंप मिळवायचा असेल तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला सादर करायचा आहे. ज्याची लिंक खाली दिलेली आहे.

👉 कुसुम सोलर पंप योजना अंतर्गत येथे अर्ज

टीप: शेतकरी बांधवानो कुसुम सोलर पंप योजने संदर्भात अनेक प्रकारच्या बोगस वेबसाईट तयार झालेल्या आहेत. त्यामार्फत तुम्हाला पैशाची मागणी सुद्धा करू शकतात. त्यामुळे शेतकरी बांधवांनी त्यांचा अर्ज अधिकृत वेबसाईटवरूनच ऑनलाइन करायचा आहे. तसेच कोणत्याही अनोळखी बोगस वेबसाईट वरून अर्ज ऑनलाइन करू नये तसेच पैशाची मागणी केल्यास पैसे देऊ नये.

Leave a Comment