नविन रेशनकार्ड ऑनलाइन कसे काढावे॥ Ration Card Online Apply ॥ How to Online Apply New Ration Card 2024॥Ration Card Download

Ration Card Online Apply Maharashtra 2024 : रेशनकार्ड हे एक अंत्यत महत्त्वाचे कायदेशीर दस्तऐवज आहे जे पात्र कुटुंबांद्वारे स्वस्त अन्नधान्याच्या खरेदीसाठी वापरले जाते आणि ते शासन अनुदानित दराने पुरवते. याशिवाय, विविध ठिकाणी ओळखीचा पुरावा म्हणून देखील रेशनकार्डचा वापर केला जातो. भारतातील प्रत्येक राज्य पात्र कुटुंबांना स्वत दराने अन्नधान्य खरेदी करता यावे यासाठी पुरवठा विभाग शिधापत्रिका जारी करते. नागरिक संबंधित प्राधिकरणाच्या अधिकृत वेबसाइट http://mahafood.gov.in वरुन रेशनकार्डसाठी, अर्जाचा लाभ घेऊ शकतात. नविन रेशनकार्ड साठी अधिक जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा, कृपया हा लेख आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करायला विसरु नका.

नवीन रेशनकार्ड ऑनलाइन कसे काढावे॥ Ration Card Online Apply ॥ How to Online Apply New Ration Card 2024॥Ration Card Download

Table of Contents

आपणास या लेखात महाराष्ट्रातील रेशनकार्ड संबंधित प्रत्येक माहिती दिले जाईल. जे पात्र अर्जदार महाराष्ट्रातुन शिधापत्रिकेचा लाभ घेण्यास इच्छुक आहेत त्यांनी ही संपूर्ण माहिती तपशीलासह वाचू शकतात ज्यात त्यांना रेशनकार्ड साठी पात्रता, निकष रेशनकार्डसाठी नमूद केलेले तपशील बदलण्यासाठी काही पायऱ्यांसह अर्ज कसा करायचा ते पहा.

👉रेशनकार्ड धारकांना आता धान्य ऐवजी मिळणार पैसे?- Ration card holders will now get money instead of grain?

महाराष्ट्र रेशन कार्ड 2024

महाराष्ट्र शासनाचा अन्न, नागरी आणि ग्राहक संरक्षण विभाग हा राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्था आणि इतर संबंधित उपक्रमांची पूर्तता करणारा विभाग आहे. महाराष्ट्र  रेशनकार्डचे तीन प्रकार आहेत. महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना तीन प्रकारच्या शिधापत्रिका निकष पाहुन दिल्या जातात. ही शिधापत्रिका कुटुंबांच्या उत्पन्नाच्या पातळीच्या आधारे जारी केली जातात. प्रत्येक शिधापत्रिकेचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

पिवळी शिधापत्रिका – दारिद्र्यरेषेखालील (बीपीएल) कुटुंबांना पिवळे रेशन कार्ड दिले जाते.

केशरी शिधापत्रिका – रु.15000/- पेक्षा जास्त आणि वार्षिक एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना केशरी शिधापत्रिका दिली जातात.

पांढरी शिधापत्रिका – 1 लाख किंवा त्याहून अधिक वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांना पांढरी शिधापत्रिका दिली जातात.

नवीन शिधापत्रिका काढण्यासाठी ज्यांनी-ज्यांनी अद्याप पर्यंत अर्ज केलेला नाही ते आता ऑनलाइन अर्ज करू शकतात. या लेखात, आम्ही महाराष्ट्र राज्यात शिधापत्रिका अर्जाविषयी सर्व महत्त्वाची माहिती सामायिक केली आहे जसे की अर्जाची प्रक्रिया, अर्ज करण्यासाठी थेट लिंक, पात्रता आवश्यकता, ऑनलाइन स्थिती, तपशीलातील बदल, महत्त्वाची कागदपत्रे इ.

हे पण वाचा 👉EWS Certificate – EWS प्रमाणपत्र

महाराष्ट्र राज्यात रेशनकार्डचे फायदे ?

  • शिधापत्रिका ही राज्यातील नागरीकांसाठी ओळखीचा व रहिवासी पुरावा म्हणूनही कामी येतो.
  • शिधापत्रिका हा एक असा दस्तऐवज आहे जो राज्य सरकारने जारी केलेल्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत महाराष्ट्रातील नागरिकांना गहू, तांदूळ, साखर यांसारख्या अनुदानित खाद्यपदार्थ स्वस्त दरात उपलब्ध करुन देतात.
  • महाराष्ट्र राज्यातील शिधापत्रिका धारक नागरीकांना स्वस्त दरात धान्य मिळून त्यांना आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करता येईल.
  • कोरानाच्या काळापासुन ते आज पर्यंत सुध्दा अन्नधान्य शासन मोफत वाटप करत आहेत.
  • एपीएल PHH, बीपीएल PHHS, AAY शिधापत्रिकेमुळे राज्यातील गरीब जनतेला अत्यंत कमी किमतीत अन्नपदार्थ मिळण्यास मदत होते, ज्यामुळे त्यांच्यावरील आर्थिक भार कमी होऊन जीवनमान उंचावण्यास मदत होऊ शकते.

प्रती व्यक्ती किती धान्य भेटेल ?

प्रती व्यक्ती गहु 3 kg, तांदुळ 2 kg, (एका व्यक्तीस एकुण 5 kg)

आपल्या कुटूंबात जेव्हढे व्यक्ती असेल त्या प्रमाणात वरील प्रमाणे सवलतीच्या दरात धान्य भेटु शकते.

महाराष्ट्र रेशनकार्ड – आढावा

रेशनकार्ड महाराष्ट्र रेशन कार्ड
लेख श्रेणी अर्ज
विभाग अन्न, नागरी व ग्राहक संरक्षण विभाग, महाराष्ट्र शासन
वर्ष 2024
PDS प्रणाली आधार सक्षम सार्वजनिक वितरण प्रणाली (AePDS)
शिधापत्रिकेचा प्रकार पिवळी, केशरी आणि पांढरी शिधापत्रिका
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन/ऑफलाइन
अधिकृत पोर्टल http://mahafood.gov.in
महाराष्ट्र AePDS पोर्टल http://mahaepos.gov.in/

हे पण वाचा 👉Solvency Certificate in Marathi – ऐपत प्रमाणपत्र कसा काढायचे ?

महाराष्ट्रात शिधापत्रिका अर्ज फॉर्म – पात्रता आवश्यकता ॥ New Ration Card

Ration Card Form

आपण ज्या रेशनकार्डसाठी अर्ज करत सादर  करणार आहोत. त्यासाठी ते पुरेसे पात्र असले पाहिजेत. अर्ज सबमिट करण्यापूर्वी नागरीकांनी रेशनकार्डसाठीचे पात्रता व निकष वाचले पाहिजेत. नवीन शिधापत्रिका जारी करण्यासाठी पात्रता तपशील या खालील विभागात प्रदान केलेला आहे. खाली दिलेले पात्रता निकष तपासा :-

  • अर्जदार 15 वर्षापासुन महाराष्ट्र राज्याचे कायमचे रहिवासी असावेत.
  • अर्जदारांकडे महाराष्ट्र राज्य किंवा भारतातील इतर कोणत्याही राज्यात इतर कोणतीही शिधापत्रिका नसावी.
  • अर्जदारांनी शिधापत्रिका जारी करण्यासाठी सरकारने निश्चित केलेल्या उत्पन्नाच्या निकषांतर्गत येणे आवश्यक आहे.

अर्ज प्रक्रिया 

  • अर्जदारांना ऑफलाइन पद्धतीने सुध्दा अर्ज सादर केले जाऊ शकतात. तथापि, अधिकृत वेबसाइटवर नवीन रेशन कार्डसाठी ऑनलाइन अर्जाची लिंक दिली आहे.
  • पात्र अर्जदारांना संबंधित प्राधिकरणाच्या अधिकृत पोर्टलवरून अर्जाच्या फॉर्मचे प्रिंटआउट डाउनलोड करून घ्यावे लागतील.
  • राज्यातील पात्र रहिवासीच शिधापत्रिकेसाठी अर्ज करू शकतात.
  • भरलेला अर्ज सर्व सहाय्यक कागदपत्रांसह विलंब न लावता संबंधित विभागाकडे जमा करावा.
  • चुकीचे व अपूर्ण पद्धतीने भरलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • अर्जदारांनी भरलेले अर्ज संबंधित तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात जमा करावेत.
  • नागरिकांनी अर्जासोबत सर्व सहाय्यक कागदपत्रे जोडल्याचे सुनिश्चित करणे आवश्यक आहे.
  • सबमिट केल्यावर, त्यांना एक अर्ज प्राप्त होईल जो त्यांनी शिधापत्रिका जारी होईपर्यंत सुरक्षित ठेवावा.

महाराष्ट्रात रेशनकार्डसाठी ऑफलाइन अर्ज कसा करावा ? Apply For Ration Card ।। New Ration Card Apply Online

महाराष्ट्र रेशनकार्डसाठीचे अर्ज ऑनलाइन जारी केले जातात म्हणजे जे पात्र नागरिक महाराष्ट्रातुन शिधापत्रिका काढण्यास इच्छुक आहेत, त्यांनी http://mahafood.gov.in. या अधिकृत वेबसाइटवरून अर्ज करावा. अर्ज प्रक्रियेसाठी फॉर्म नमूना 1 दाखल केला जाईल.

Ration Card Apply

अर्ज आफलाईन डाउनलोड करण्याची संपूर्ण प्रक्रिया खाली दिली आहे, त्यानुसार खालील पायऱ्यांचे अनुसरन करुन आपण अर्ज डाउनलोड करु शकता :-

  • पायरी 1- FCCPD, महाराष्ट्राच्या अधिकृत पोर्टलला भेट द्या म्हणजेच http://mahafood.gov.in.
  • पायरी 2- मुख्यपृष्ठाच्या डाव्या बाजूला दिलेल्या “डाउनलोड” लिंकवर क्लिक करा.
  • पायरी 3- “ नमुना १: नवीन शिधापत्रिकेसाठी अर्ज ” लिंकवर क्लिक करा.
  • चरण 4- अर्जाचा फॉर्म दिसेल.
  • पायरी 5- नागरिक अर्जाचा तपशील तपासू शकतात.
  • पायरी 6- नागरिकांना रेशन कार्ड डाउनलोड करून प्रिंट करावे लागेल.
  • पायरी 7- आता, त्यांना सर्व योग्य तपशीलांसह अर्ज भरावे लागतील.
  • पायरी 8- उमेदवारांना अर्जासोबत सर्व महत्त्वाची कागदपत्रे जोडावी लागतील.
  • पायरी 9- शेवटी, त्यांना संबंधित विभागाकडे अर्ज सादर करावा लागेल.

👉ऑफलाइन रेशनकार्ड अर्ज डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 👈

महाराष्ट्रात रेशनकार्डसाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा ? Apply For Ration Card

महाराष्ट्र रेशनकार्डसाठीचे अर्ज ऑनलाइन केले जातात म्हणजे जे पात्र नागरिक महाराष्ट्रातुन शिधापत्रिका काढण्यास इच्छुक आहेत, त्यांनी http://mahafood.gov.in. या अधिकृत वेबसाइटवरून अर्ज करावा.

Ration Card Apply

अर्ज ऑनलाइन करण्याची संपूर्ण प्रक्रिया खाली दिली आहे, त्यानुसार खालील पायऱ्यांचे अनुसरन करुन आपण ऑनलाइन अर्ज करु शकता :-

How To Apply For Ration Card Online

  • पायरी 1- FCCPD, महाराष्ट्राच्या अधिकृत पोर्टलला भेट द्या म्हणजेच http://mahafood.gov.in.
  • पायरी 2- मुख्यपृष्ठाच्या उजव्या बाजूला दिलेल्या “ऑनलाइन सेवा ” हा पर्याय दिसेल.
  • पायरी 3- “ ऑनलाईन शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली ” या पर्यायावर क्लिक करा. https://rcms.mahafood.gov.in/ हा दुवा वापरुन डायरेक्ट जाऊ शकता.
  • पायरी 4- ऑनलाईन अर्ज करण्याचे मुख्य पेज ओपेन होईल.
  • पायरी 5- मुख्यपृष्ठाच्या उजव्या बाजूला वरच्या बाजूस SINE IN / Register हा पर्याय दिसेल.
  • पायरी 6- त्यावऱ क्लिक केल्यानंतर Public Login हा पर्याय दिसेल.
  • पायरी 7- या नंतर SELF SERVICE FOR RATION CARD हा पर्याय दिसेल. https://rcms.mahafood.gov.in/PublicLogin/frmPublicLogin.aspx
  • कुटुंब प्रमुखाचा मोबाईल नंबर आधार कार्ड सोबत लिंक असणे आवश्यक असते.
  • पायरी 8- New User Sing Up Here या पर्यायावर  1.  I have a valid Ration Card & I am a HoF/HoFN    2. I have a Ration Card & I am a member other than HoF/HoFN    3. I want to apply for new Ration Card योग्य पर्याय निवडून अगोदर नोंदणी करून घ्यावी. व user name आणि Password लिहून ठेवावा.
  • पायरी 8- आता, Register User वर Login करून त्यांना सर्व योग्य तपशीलांसह अर्ज भरावे लागतील.
  • पायरी 9- उमेदवारांना अर्जासोबत सर्व महत्त्वाची कागदपत्रे ऑनलाइन जोडावी लागतील.

महाराष्ट्र रेशन कार्ड अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे ? New Ration Card Apply Online

शिधापत्रिकेसाठी अर्ज करताना, अर्जदारांना खालील कागदपत्रे प्रदान करावी लागतात :-

How To Apply Ration Card in online

  1. आधार कार्ड (कुटंबातील सर्वांचे)

(कुटूंबप्रमुखाच्या आधारला मोबाईल लिंक असणे आवश्यक आहे)

  1. पॅन कार्ड
  2. उत्पन्नाचा दाखला
  3. जात प्रमाणपत्र (असल्यास)
  4. अपंग प्रमाणपत्र (असल्यास)
  5. वीज बिल / टेलिफोन बिल
  6. गॅस कनेक्शन तपशील
  7. बँक पासबुक (कुटूंब प्रमुख महिला)
  8. निवासी पुरावा जसे घर भाड्याची पावती
  9. पासपोर्ट साईज फोटो
  10. मोबाईल नंतर

हे पण वाचा 👉30 % महिला आरक्षण काय आहे ? | प्रमाणपत्र कसे काढायाचे ?

प्रक्रीयेचा वेळ ?

ऑनलाइन अर्ज सादर केल्यानंतर 30 ते 45 दिवसात आपले रेशनकार्ड तयार होते.

टीप- अर्ज सादर करताना उमेदवारांनी अर्जावर रु.5/- कोर्ट फी स्टँप लावल्याची खात्री करावी.

वरीलपैकी कोणत्याही कागदपत्रांशिवाय सादर केलेला अर्ज अपूर्ण मानला जाईल आणि तो नाकारला जाईल.

रेशनकार्डची स्थिती ऑनलाइन कशी तपासायची ? Ration Card Status

अर्ज सादर केल्यानंतर, अर्जदार अर्जाची ऑनलाइन स्थिती तपासू शकतात. रेशनकार्ड अर्जाची ऑनलाइन स्थिती तपासण्यासाठी, नागरिकांनी खाली दिलेल्या सोप्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे :-

  1. संबंधित प्राधिकरणाच्या अधिकृत वेबसाइटवर जा. म्हणजे http://mahafood.gov.in. या साइटवर
  2. “पारदर्शकता पोर्टल” लिंकवर क्लिक करा.
  3. “अलोकेशन जनरेशन स्टेटस” लिंकवर क्लिक करा.
  4. रेशनकार्ड तपशील प्रविष्ट करा आणि पुढे जा.
  5. अर्जाची स्थिती दिसेल.

किंवा

Ration Card Status

New Ration Card Form PDF

मोबाईलवर गुगल प्लेस्टोर (google play store) वरुन mera ration app डाउनलोड करुन घ्यावी.

List Of Ration Card

E Ration Card Download 
  1.  app डाउनलोड झाल्यानंतर Aadhaar Seeding या पर्यायावर क्लिक करावे.
  1. येथे आपला रेशनकार्ड नंबर शोधण्याचे दोन पर्याय दिसतील
    1. आरसीआडी नंबर 12 अंकी
    2. आधार नंबर
  1. आधार नंबर हा पर्याय निवडुन आपल्या आधार नंबर प्रवीष्ट करावा.
  1. आपले रेशनकार्ड तयार झालेले असल्यास आपल्याला आपला 12 अंकी आर.सी.आय.डी. (RCID) नंबर दिसेल. तेव्हा  Ration Card Download करू शकता.

शिधापत्रिकेत नाव वाढविणे

ज्या नागरिकांकडे आधीचे रेशनकार्ड आहे पण त्यांना सध्याच्या रेशनकार्डमध्ये नावे वाढवयाचे आहे ते देखील करू शकतात. त्यासाठी त्यांना फॉर्म नमूना 8 भरावा लागेल. हा फॉर्म सुद्धा अधिकृत पोर्टलवर उपलब्ध आहे.

रेशन कार्डमधील नावे वाढवयासाठीचा फॉर्म नमूना 8 डाउनलोड करण्यासाठी, नागरिकांना डाउनलोड लिंकवर क्लिक करावे लागेल आणि फॉर्म नमूना 8 लिंकवर क्लिक करावे लागेल.

ते खाली सामायिक केलेल्या दुव्यावरून सुद्धा ते डाउनलोड करू शकतात :-

👉फॉर्म नमूना 8: रेशनकार्डमध्ये नावे वाढविण्यासाठो  येथे क्लिक करा👈 

शिधापत्रिकेत बदल

ज्या नागरिकांकडे आधीचे रेशनकार्ड आहे पण त्यांना सध्याच्या रेशनकार्डमध्ये बदल करायचा आहे ते देखील करू शकतात. त्यासाठी त्यांना फॉर्म नमूना 14 भरावा लागेल. हा फॉर्म सुद्धा अधिकृत पोर्टलवर उपलब्ध आहे.

रेशन कार्डमधील बदलासाठी फॉर्म नमूना 14 डाउनलोड करण्यासाठी, नागरिकांना डाउनलोड लिंकवर क्लिक करावे लागेल आणि फॉर्म नमूना 14 लिंकवर क्लिक करावे लागेल.

ते खाली सामायिक केलेल्या दुव्यावरून सुद्धा ते डाउनलोड करू शकतात :-

👉फॉर्म नमूना 14: रेशनकार्डमध्ये बदल करण्यासाठी येथे क्लिक करा👈 

युनिट्समध्ये घट (नाव हटवणे)

जर नागरिकांना शिधापत्रिकेतील कुटुंबातील सदस्यांची नावे मुलीच्या विवाहामुळे अथवा विभक्त कुटूंबामुळेकिंवा इतर कोणत्यही कारणामुळे नावे हटवायची असतील तर ते फॉर्म नमूना ९ भरूनही करू नावे कमी करु शकतात. फॉर्म नमूना 9 कुटुंबातील युनिट कमी करण्यासाठी आहे. जे नागरीक हा फॉर्म शोधत आहेत ते खाली सामायिक केलेल्या लिंकवरून अधिकृत पोर्टलवरुन डाउनलोड करू शकतात : –

👉फॉर्म नमूना 9 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा: युनिट्समध्ये घट (नाव हटवणे)👈

डुप्लिकेट महाराष्ट्र रेशन कार्डसाठी अर्ज

ज्या नागरिकांचे रेशनकार्ड हरवले, खराब झाले किंवा चुकले असेल तर त्यांना दुय्यमप्रत (डुप्लिकेट) रेशनकार्ड मिळण्याचा पर्याय उपलब्ध आहे. डुप्लिकेट रेशनकार्ड जारी करण्यासाठी, नागरिकांना अधिकृत वेबसाइटच्या डाउनलोड लिंकवर उपलब्ध फॉर्म नमूना 15 डाउनलोड करावा लागेल.

नागरिकांना अर्जाची प्रिंट काढुन त्यांचे सर्व तपशील बरोबर भरावे लागतील आणि त्यासोबत सहाय्यक कागदपत्रे (आवश्यकतेनुसार) सादर करावी लागतील.

ते दिलेल्या लिंकवरून दुय्यमप्रत (डुप्लिकेट) रेशनकार्ड अर्ज डाउनलोड करू शकतात-

👉फॉर्म नमूना 15 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा: डुप्लिकेट रेशन कार्ड जारी करणे 👈

 Ration Card List 

👉FPS स्थिती तपासण्यासाठी येथे क्लिक करा 👈

 

FAQ

प्रश्न : 1) Ration Card Online Maharashtra

उत्तर :- As shown above

प्रश्न : 2) Ration Card number search Maharashtra

उत्तर :- As shown above

प्रश्न : 3) Maharashtra Ration Card app

उत्तर :- As shown above

प्रश्न : 4) RC Details Ration Card

उत्तर :- As shown above

प्रश्न : 5) Ration Card online check

उत्तर :- As shown above

प्रश्न : 6) रेशन कार्ड ऑनलाइन महाराष्ट्र

उत्तर :- वरील प्रमाणे

प्रश्न : 7) Ration Card Download

उत्तर :- As shown above

प्रश्न : 8) रेशन कार्ड नवीन नाव नोंदणी

उत्तर :- वरील प्रमाणे

प्रश्न : 9) रेशन कार्ड नाव कमी करणे अर्ज 

उत्तर :- वरील प्रमाणे

प्रश्न : 10) पिवळे रेशन कार्ड नोंदणी नवीन online

उत्तर :- वरील प्रमाणे

Leave a Comment